Education News: शिक्षण शुल्कामध्ये सुधारणाच होईना; अठ्ठेचाळीस वर्षांपासूनची स्थिती, समिती स्थापण्याची शिक्षण संस्था मागणी
Maharashtra Schools: राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांना मिळणारी शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती १९७८ पासून सुधारली गेलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीच्या उपक्रमांवर परिणाम होत आहे.
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून दिली जाणारी शुल्क प्रतिपूर्ती ४८ वर्षांपासून म्हणजेच मे १९७८ पासून सुधारित करण्यात आलेली नाही.