esakal | पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आता ८ ऑगस्टला
sakal

बोलून बातमी शोधा

Scholarship

पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आता ८ ऑगस्टला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनामुळे (corona) याआधी तीन वेळा लांबणीवर पडलेली पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा (scholarship exam) आता येत्या ८ ऑगस्टला घेतली जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा आदेश महाराष्ट्र राज्‍य परीक्षा परिषदेला नुकतेच दिला आहे. (Fifth and eighth standard scholarship examination now 8th August )

दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी ही परीक्षा घेण्यात येते. यंदा मात्र या कालावधीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात होऊ लागली होती. त्यामुळे राज्य सरकारने ही परीक्षा स्थगित केली होती. त्यानंतर एप्रिलच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी ही परीक्षा घेण्यास सरकारने राज्य परीक्षा परिषदेला परवानगी दिली होती. परंतु याच कालावधीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील संसर्गांचे प्रमाण खूप वाढले होते. त्यामुळे दुसऱ्यांदा ही परीक्षा स्थगित करावी लागली होती. त्यानंतर २३ मे २०२१ ला ही परीक्षा ठेवण्यात आली होती. परंतु, सलग तिसऱ्यांदा कोरोनामुळे ही परीक्षा स्थगित करण्याची वेळ आली होती.

हेही वाचा: दैनिक भास्करच्या कार्यालयांवर IT चा छापा; संसदेत पडसाद

कोरोना संसर्गामुळे गेल्या शैक्षणिक वर्षातील पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा अद्याप झालेली नाही. त्यातच आता १५ जून २०२१ पासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. त्यामुळे या नवीन शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती परीक्षेबाबतची प्रक्रियाही सुरु करावी लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर येत्या ८ ऑगस्टमध्ये मागील शैक्षणिक वर्षातील पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यास शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी परवानगी दिली आहे

loading image