esakal | दैनिक भास्करच्या कार्यालयांवर IT चा छापा; 'सत्य दाखवल्याची शिक्षा' काँग्रेसचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

दैनिक भास्करच्या कार्यालयांवर IT चा छापा; संसदेत पडसाद

दैनिक भास्करच्या कार्यालयांवरील छापासत्र भोपाळ, जयपूर, अहमदाबाद आणि इतर ठिकाणी सुरु आहे. याचे पडसाद संसदेतही उमटले.

दैनिक भास्करच्या कार्यालयांवर IT चा छापा; संसदेत पडसाद

sakal_logo
By
सूरज यादव

दैनिक भास्कर ग्रुपच्या कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. करचोरीच्या आरोपावरून दैनिक भास्करच्या कार्यालयांवर गुरुवारी आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला. हे छापासत्र भोपाळ, जयपूर, अहमदाबाद आणि इतर ठिकाणच्या कार्यालयांमध्ये सुरु आहे. याचे पडसाद संसदेतही उमटले. काँग्रेससह विरोधी पक्षांनी यावरून जोरदार गोंधळ घातला. यामुळे राज्यसभेचं कामकाज काही काळ स्थगित करावं लागलं.

पीटीआय़ने दिलेल्या वृत्तानुसार, दैनिक भास्करच्या कार्यालयांवर छाप्याविरोधात संसदेत विरोधी पक्षांच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर राज्यसभेचं कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं.

हेही वाचा: 'सब याद रखा जाएगा'; सरकारच्या 'त्या' दाव्यावर संतापले राहुल गांधी

दैनिक भास्करवर छापा प्रकरणावरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्यासह दिग्विजय सिंह यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून म्हटलं की, दैनिक भास्करने त्यांच्या रिपोर्टिंगमधून मोदी सरकारच्या कोरोना काळातील व्यवस्थापनातील गोंधळ उघडा पाडला होता. आता याची किंमत त्यांना मोजावी लागत आहे. ही अघोषित आणीबाणी असल्यासारखं आहे.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी ट्विट करताना मोदी, शहांच्याकडून पत्रकारीतेवर हल्ला असल्याचं म्हटलं आहे. दिग्विजय सिंह म्हणाले की,'पत्रकारितेवर मोदी शहांचा हल्ला. मोदी शहा यांचे एकच शस्त्र आय़टी, ईडी आणि सीबीआय. मला विश्वास आहे की अग्रवाल बंधु घाबरणार नाहीत. दैनिक भास्करच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर आयकर विभागाने छापा टाकला आहे.' दैनिक भास्कर ग्रुप देशात पाच वर्तमान पत्रे प्रकाशित करते. हिंदी, मराठी आणि गुजराती भाषांमध्ये 65 एडिशन देशातील वेगवेगळ्या भागात प्रकाशित होतात.

loading image