पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत वाबळेवाडीची वैभवी राज्यात दुसरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vaibhavi sonkatale

इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील अटल बिहारी वाजपेयी इंटरनॅशनल स्कूलची वैभवी संजय सोनकटाळे ग्रामीण विभागातून राज्यात दुसरी आली.

Scholarship Exam : पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत वाबळेवाडीची वैभवी राज्यात दुसरी

पुणे - इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील अटल बिहारी वाजपेयी इंटरनॅशनल स्कूलची वैभवी संजय सोनकटाळे ग्रामीण विभागातून राज्यात दुसरी आली आहे. वैभवीला ३०० पैकी २९४ गुण मिळाले आहेत.

दरम्यान, इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मिळून वाबळेवाडीचे एकूण ६७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जूलै २०२२ मध्ये ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येणारी वाबळेवाडी ही जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली असल्याचे या शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार यांनी सांगितले.

शाळेचा पाचवीचा निकाल १०० टक्के लागला आहे. पाणवीचे सर्व ६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत . त्यापैकी ६ विद्यार्थी राज्य गुणवत्ता तर ३३ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले आहेत.

इयत्ता आठवीचे ४ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत तर २४ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले आहेत .

राज्य गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी

इयत्ता - पाचवी

  • वैभवी संजय सोनकटाळे

  • स्वराली गोरक काळे

  • संस्कार विजय गिते संस्कृती श्रीकांत विरोळे

  • रेवती जगदीश पिल्ले

  • आर्यन नितिन भुजबळ

इयत्ता - आठवी

  • प्रणव प्रकाश मांढरे

  • पार्थ बापू डफळ

  • परेश राजेंद्र डफळ

  • अपेक्षा निलेश मासळकर

इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना गोरख भाऊसाहेब काळे व प्रतिभा गोरख काळे यांनी तर, इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना जयश्री सुनिल पलांडे व सुनिल वसंत पलांडे यांनी मार्गदर्शन केले.

या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर,विस्तार अधिकारी वंदना शिंदे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे,व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप वाबळे, माजी सरपंच केशवराव वाबळे, माजी अध्यक्ष सुरेखा वाबळे, काळूराम वाबळे आदींनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.