रविवारच्या आत भरा अकरावी प्रवेशासाठी पसंती क्रमांक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रविवारच्या आत भरा अकरावी प्रवेशासाठी पसंती क्रमांक

रविवारच्या आत भरा अकरावी प्रवेशासाठी पसंती क्रमांक

पुणे, : अकरावी प्रवेशासाठी दुसरा टप्पा बुधवारपासून सुरू झाला असून, शाखा आणि महाविद्यालयांचा पसंती क्रमांक ठरविण्याची अंतिम मुदत रविवार (ता. २२) पर्यंत आहे. शहरात केंद्रीभूत अकरावी प्रवेश प्रक्रियेला गती आली आहे. शहरात आतापर्यंत ६२ हजार ७८१ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला असून, त्यातील ४५ हजार २६९ विद्यार्थ्यांनी अर्ज पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर ४८ हजार ९३३ जणांनी अर्ज लॉक करण्याचा पर्याय निवडला आहे.

बुधवारी दाखल झालेल्या अर्जांपैकी २४ हजार ६०३ विद्यार्थ्यांनी शाखा आणि महाविद्यालयांचा पसंती क्रमांक नोंदविला आहे. शहरात ३०८ कनिष्ठ महाविद्यालयांतील एक लाख १० हजार ५५ जागांसाठी ही केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया पार पडत आहे. अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी https://pune.11thadmission.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

हेही वाचा: "आघाडीमुळे तिन्ही पक्षांचा श्वास कोंडला, भाजपाला विस्ताराची संधी"

‘आयसीएसई’च्‍या विद्यार्थ्यांसाठी सूचनापत्र :

आयसीएसई बोर्डाच्‍या विद्यार्थ्यांकरिता महत्त्वाचे सूचनापत्रक मंगळवारी जारी करण्यात आले. यानुसार ज्‍या विद्यार्थ्यांना बेस्‍ट फाइव्‍हचा लाभ घ्यायचा असेल, त्‍यांनी ग्रुप एक, ग्रुप दोनमधील सहा विषयांपैकी कोणतेही पाच विषयांचे बेस्‍ट फाइव्‍ह गुण ग्राह्य धरावे किंवा दुसऱ्या पर्यायानुसार ज्‍या विद्यार्थ्यांना ग्रुप तीनमधील गुण विचारात घेण्‍याची इच्‍छा आहे, अशा विद्यार्थ्यांच्या ग्रुप एक, ग्रुप दोन व ग्रुप तीनमधील सात विषयांची (सातशे गुण) सरासरी ग्राह्य धरली जाईल.

Web Title: Fill In The Preference Number For 11th Admission Within Sunday

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News11th admission