विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! लवकरच मिळणार मोफत पुस्तके

books
bookse sakal
Updated on

तेल्हारा (जि. अकोला) : समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत मोफत पाठ्य पुस्तके (free books to student) दिली जातात; पण यावर्षी कोरोनामुळे छपाई झाली नव्हती. आता तालुका स्तरावर पुस्तके पोहोचली आहेत. शाळा स्तरावर पुस्तके उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू आहे. पुढील आठवड्यात वितरण होईल असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

books
VIDEO : हेलिकॉप्टर उडविण्याचं स्वप्न क्षणात भंगलं, ट्रायल घेताना तरुणाचा मृत्यू

कोरोनापूर्व काळात उन्हाळाच्या सुट्टीत ही पुस्तके शाळास्तरावर पोहोचत होते आणि शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थांना पाठ्यपुस्तके दिली जात होती. मार्च २०२० पासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला तेव्हापासून आजपर्यंत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग बंद आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. सध्या ऑनलाइन शिक्षणचे सुरू आहे. पण पुस्तकांशिवाय विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागत आहे. कोरोनामुळे पुस्तकांची छपाई झाली नव्हती. त्यामुळे पुस्तके उपलब्ध होऊ शकले नाहीत. दीड महिन्यापासून पुस्तकाविना अभ्यास करावा लागत आहे. नुकतेच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके तालुका स्तरावर उपलब्ध झाली आहेत. तालुक्यात दहा केंद्र शाळा आहेत. त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थी शाळांमध्ये पुस्तके देण्याचे नियोजन सुरू आहे. पुढील आठवड्यात वितरण करण्यात येईल. विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येईल.

तालुकास्तरावर मोफत पाठ्यपुस्तके प्राप्त झालेली आहे. केंद्रस्तरावर आल्यावर त्याचे वाटप शाळांना व शाळा विद्यार्थ्यांना लगेच करणार आहे.
- दीपक दही, केंद्रप्रमुख, बेलखेड
सेतू अभ्यासक्रमाची तयारी करून घ्यायची असल्याने गत वर्षीची पुस्तके जमा करून पुन्हा वाटता आली नाही; पण आम्ही त्या आधीची पुस्तके जमा केली होती. ती पुस्तके विद्यार्थ्यांना वाटली. त्यामुळे तात्पुरते काम भागले. आता नवीन पुस्तके मिळणार आहेत.
-तुळशीदास खिरोडकर, उपक्रमशील शिक्षक, खंडाळा, पं. स. तेल्हारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com