- मृदुला अडावदकर, सर्जनशील व आंतरविद्याशाखीय शिक्षणतज्ज्ञ
विज्ञानाचं कोणतंही पाठ्यपुस्तक उघडून बघा. काय दिसतं? नियम, सूत्रे आणि दाटीवाटीने बसलेल्या वैज्ञानिक संकल्पना. विज्ञानाच्या या अशा अभ्यासाला कंटाळलेले विद्यार्थी मग वैतागून म्हणतात, ‘कुणी सांगितलं होतं न्यूटनला गुरुत्वाचा शोध लावायला? मिळालं ते सफरचंद खाऊन त्याने विषय का नाही संपवला?’’