esakal | FSSAI मध्ये ग्रुप ए आणि इतर पदांची थेट भरती! 'या' दिवसापासून करा ऑनलाइन अर्ज | Jobs
sakal

बोलून बातमी शोधा

एफएसएसएआयमध्ये ग्रुप ए आणि इतर पदांची थेट भरती! "या' दिवसापासून करा ऑनलाइन अर्ज

फूड सेफ्टी किंवा "एफएसएसएआय'मध्ये सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे.

Jobs : FSSAI मध्ये ग्रुप ए आणि इतर पदांची थेट भरती!

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : फूड सेफ्टी किंवा 'एफएसएसएआय'मध्ये (Food Safety and Standards Authority of India)) सरकारी नोकरी (Government job) शोधत असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI), भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या (Ministry of Health and Family Welfare) अंतर्गत स्वायत्त संस्थेत एकूण 254 ग्रुप ए आणि इतर पदांवर थेट भरतीसाठी (Recruitment) दोन स्वतंत्र भरती जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत.

30 सप्टेंबर 2021 रोजी प्राधिकरणाने जारी केलेली जाहिरात क्र. DR-03/2021 नुसार, सहाय्यक संचालक आणि उपव्यवस्थापकाच्या एकूण 21 पदांची भरती करायची आहे. त्याचप्रमाणे दुसरी भरती जाहिरात क्र. DR-04/2021 नुसार, तांत्रिक अधिकारी, केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी (CFSO), सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक आणि इतरांच्या एकूण 233 पदांची भरती करायची आहे.

असा करा अर्ज

इच्छुक आणि पात्र उमेदवार FSSAI च्या भरती जाहिरातींनुसार ऑनलाइन अर्ज करू शकतात. प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइट fssai.gov.in वर अर्जाचा फॉर्म उपलब्ध आहे. अर्ज प्रक्रिया 8 ऑक्‍टोबर 2021 पासून सुरू होईल आणि उमेदवार 7 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करू शकतील. ऑनलाइन अर्जादरम्यान उमेदवारांना 1500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, त्यापैकी 500 रुपये इंटिमेशन चार्जेस म्हणून द्यावे लागतील. तथापि, एससी, एसटी, ईडब्ल्यूएस, दिव्यांग आणि महिला उमेदवारांना फक्त 500 रुपये इंटिमेशन चार्ज भरावा लागेल आणि त्यांना अर्ज शुल्कामध्ये पूर्ण सूट दिली जाईल. ऑनलाइन माध्यमातून फी भरता येईल.

'या' पदांसाठी राबविली जाईल भरती प्रक्रिया

 • प्रधान व्यवस्थापक - 1 पद

 • सहाय्यक संचालक - 15 पदे

 • उपव्यवस्थापक - 6 पदे

 • फूड ऍनालिस्ट - 4 पदे

 • तांत्रिक अधिकारी - 125 पदे

 • केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी - 37 पदे

 • असिस्टंट मॅनेजर (IT) - 4 पदे

 • सहाय्यक व्यवस्थापक - 4 पदे

 • सहाय्यक - 33 पदे

 • हिंदी अनुवादक - 1 पद

 • पर्सनल असिस्टंट - 19 पदे

 • आयटी सहाय्यक - 3 पदे

 • कनिष्ठ सहाय्यक ग्रेड -एक - 3 पदे

loading image
go to top