esakal | सुवर्ण संधी! 'GAIL'मध्ये 220 जागांसाठी सरकारी नोकरी; 5 ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

GAIL Recruitment

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी!

सुवर्ण संधी! 'GAIL'मध्ये 220 जागांसाठी सरकारी नोकरी

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

GAIL Recruitment 2021: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी! भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील महारत्न कंपनी गेल (इंडिया) लिमिटेडने (GAIL India Limited Company) विविध विभागांमधील एकूण 220 सरकारी जागांसाठी (Government Jobs) (नोकरी) भरतीची जाहिरात प्रसिद्ध केलीय. बुधवार, 7 जुलै 2021 रोजी गेलने जाहीर केलेल्या अद्ययावत माहितीनुसार, मॅकेनिकल (Mechanical), मार्केटिंग (Marketing), एचआर, सिव्हिल, लॉ, राजभाषा इत्यादी विभागांमध्ये व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता, वरिष्ठ अधिकारी आणि अधिकारी या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. (GAIL Recruitment 2021 For 220 Vacancies Apply Online For gailonline com By August 5)

दरम्यान, इच्छुक उमेदवार गेल (इंडिया) लिमिटेडच्या gailonline.com या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया बुधवार 7 जुलैपासून सुरू झाली असून उमेदवार 5 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात. मात्र, यासाठी उमेदवारांना 200 रुपये फी भरावी लागणार आहे, परंतु एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना यात सवलत देण्यात आली असून त्यांच्याकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात आले नाही.

हेही वाचा: JHT, CHSL, JE परीक्षांचा निकाल 'या' दिवशी होणार जाहीर!

'या' पदांसाठी होणार भरती

 • व्यवस्थापक : 4 पद 4

 • व्यवस्थापक (विपणन आंतरराष्ट्रीय एलएनजी व शिपिंग) : 6 पद

 • वरिष्ठ अभियंता (रसायन) : 7 पद

 • वरिष्ठ अभियंता (यांत्रिकी) : 51 पद

 • वरिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) : 26 पद

 • वरिष्ठ अभियंता (इंस्ट्रुमेंटेशन) : 3 पद

 • वरिष्ठ अभियंता (सिव्हिल) : 15 पद

 • वरिष्ठ अभियंता (गेलटेल टीसी-टीएम) : 10 पद

 • वरिष्ठ अभियंता (बॉयलर ऑपरेशन) : 5 पद

 • वरिष्ठ अभियंता (पर्यावरण अभियांत्रिकी) : 5 पद

 • वरिष्ठ अधिकारी (ई-पी) : 3 पद

 • वरिष्ठ अधिकारी (एफ/एस) : 10 पद

 • वरिष्ठ अधिकारी (सी-पी) : 10 पोस्ट

 • वरिष्ठ अधिकारी (बीआयएस) : 9 पद

 • वरिष्ठ अधिकारी (विपणन) : 8 पद

 • वरिष्ठ अधिकारी (एचआर) : 18 पद

 • वरिष्ठ अधिकारी (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) : 2 पद 2

 • वरिष्ठ अधिकारी (कायदा) : 4 पद 4

 • वरिष्ठ अधिकारी (एफ-ए) : 5 पद

 • अधिकारी (प्रयोगशाळा) : 10 पद

 • अधिकारी (सुरक्षा) : 5 पद 5

 • अधिकारी (राजभाषा) : 4 पद

GAIL Recruitment 2021 For 220 Vacancies Apply Online For gailonline com By August 5

loading image