- मृदुला अडावदकर, सर्जनशील व आंतरविद्याशाखीय शिक्षणतज्ज्ञ
प्राथमिक शाळेत शिकत असताना आम्हाला ‘सामुदायिक जीवन’ नावाचा विषय होता. त्यामध्ये आपल्या शेजाऱ्यांशी, आपल्या भावंडांशी कसं वागावं? समाजात वावरण्याचे नियम कोणते असतात? ते पाळणे का महत्त्वाचं असतं? वगैरे वगैरे मुद्द्यांवर आधारित धडे होते. आपल्या परिसराची स्वच्छता ठेवा. कचरा हा कचराकुंडीतच टाका.