
भारतीय कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
भारतीय कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. जागतिक ग्राहक सेवा सॉफ्टवेअर आणि सेवा कंपनी (Global Customer Service Software and Services Company) 7.ai नं मंगळवारी एक मोठी घोषणा केलीय. ही कंपनी संपूर्ण भारतातून सुमारे 9,000 नवीन कर्मचारी नियुक्त करण्याची योजना आखत आहे. यामध्ये टियर II आणि III शहरांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.
कंपनीच्या मते, या कर्मचाऱ्यांना कुठूनही काम करता येणार आहे. 7.ai कंपनी FY23 मध्ये 9 हजार नवीन कर्मचार्यांची नियुक्ती करेल. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय क्लायंट बेसला सेवा देण्यासाठी व्हॉइस आणि चॅट प्रक्रियांव्दारे ही भरती चालणार आहे. नीना नायर (Nina Nair) म्हणाल्या, गेल्या काही वर्षांमध्ये उद्योग जगतात मोठ्या संधी निर्माण झाल्या असून भारतात टॅलेंट शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही आमच्या लोकांमध्ये गुंतवणूक करत राहतो आणि नवोदितांना संधी देत असतो, असं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी आपल्या व्यवसायाच्या मागणीतील वाढ पूर्ण करण्यासाठी भारतातून 5,000 लोकांना कामावर घेतलं होतं, असं कंपनीचं म्हणणं आहे.
ग्राहकांना हवं तसं काम करणं आणि त्यांना समाधानी ठेवणं हे कंपनीचं ध्येय आहे. हे ध्येय त्यांना आर्टिफिशल इंटेलिजन्स, मानवी दृष्टिकोन आणि इतर तज्ज्ञांच्या मदतीनं साध्य करायचं आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या साहाय्यानं व्यवसाय आणि ग्राहक यांच्यातले व्यवहार अधिक सुकर आणि सुलभ होतील. कंपनीला नुकताच लास वेगास येथील CCW एक्सलन्सचा "BPO ऑफ द इयर" पुरस्कार (CCW Excellence Awards) मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.