

Google Job Hiring Tips
sakal
GOOGLE HIRING PROCESS AND SELECTION TIPS: टेक क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या अनेक तरुणांचं गुगलमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असतं. मात्र, चांगली पदवी आणि कौशल्यं असूनही गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी नेमकी तयारी कशी करावी, असा प्रश्न अनेकांना पडतो. अशा वेळी गुगलमधील सीनियर टेक्निकल रिक्रूटर बेन मीड यांनी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. रिझ्युमे तयार करण्यापासून ते मुलाखतीची तयारी करण्यापर्यंत कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे त्यांनी सांगितलं आहे. चला तर मग, जाणून घेऊया गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी कोणती तयारी करावी