esakal | दहावी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; तब्बल 1074 पदांसाठी सरकारी नोकर्‍या, दरमहा 1.60 लाखांपर्यंत पगार

बोलून बातमी शोधा

Government Jobs

दहावी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; तब्बल 1074 पदांसाठी सरकारी नोकर्‍या, दरमहा 1.60 लाखांपर्यंत पगार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, डीएफसीआयएलने कार्यकारी व इतर पदांसाठी अर्ज मागविले आहेत. यासाठी पात्र उमेदवार डीएफसीसीआयएलच्या dfccil.com अधिकृत वेबसाइटवर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. दरम्यान, 24 एप्रिल 2021 पासून अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 मे 2021 आहे.

अर्जदाराकडे विविध पदांसाठी विहित शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता आहे. कागदपत्र पडताळणी / मुलाखतीच्या वेळी उमेदवारांना गुणपत्रके आणि पदवी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल. शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा पदांनुसार वेगळी ठेवण्यात आली आहे. तसेच, दहावीनंतर आयटीआय अभ्यासक्रम झालेल्या विद्यार्थ्यांकरिता विद्याशाखेत पदविका, कोणत्याही विषयातून सामान्य पदवी, एमबीए किंवा पीजीडीएम आणि अभियांत्रिकी पदवीची पदे रिक्त आहेत.

'Indira Gandhi University'कडून विद्यार्थ्यांना दिलासा; 'Assignment Submission'ची वाढवली मुदत

कोणत्या पदासाठी किती पगार मिळेल?

 1. कनिष्ठ व्यवस्थापक - दरमहा 50 हजार ते 1.60 लाख रुपये

 2. कार्यकारी - दरमहा 30 हजार ते 1.20 लाख रुपये

 3. कनिष्ठ कार्यकारी - दरमहा 25 हजार ते 68 हजार रुपये

हे मूलभूत वेतन आहे. शिवाय केंद्रीय वेतनश्रेणीनुसार तुम्हाला इतर भत्त्यांबरोबर दरमहा चांगला पगारही मिळू शकतो.

अर्ज फी : कनिष्ठ व्यवस्थापकासाठी 1000 रुपये, कार्यकारी 900 आणि कनिष्ठ कार्यकारी पदासाठी 700 रुपये आहे. सामान्य, ओबीसी एनसीएल आणि आर्थिक कमजोर वर्गाला अर्ज फी भरावी लागणार आहे. मात्र, एससी, एसटी, दिव्यांग आणि माजी कर्मचार्‍यांसाठी अर्ज फी विनामूल्य असेल.

अशी होईल निवड : संगणक परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. सीबीटीच्या दोन-तीन सत्रांत दोन तासात ही परीक्षा असेल. पात्र होण्यासाठी उमेदवारांना प्रत्येक चाचणीत कमीत-कमी 42 गुणांची टी-स्कोअर करावी लागेल. पात्रता, रिक्त पदांची उपलब्धता आणि आरक्षणाच्या नियमांनुसार, मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी शॉर्टलिस्टेड उमेदवारांना बोलावण्यात येईल.

सुवर्णसंधी! Indian Navy मध्ये तब्बल 2500 पदांसाठी मोठी भरती; 'असा' भरा अर्ज

'या' पदांसाठी होणार भरती

 • कनिष्ठ व्यवस्थापक (सिव्हिल) - 31

 • कनिष्ठ व्यवस्थापक (ऑपरेशन्स आणि बीडी) - 77

 • कनिष्ठ व्यवस्थापक (मेकॅनिकल) - 03

 • कार्यकारी (सिव्हिल) - 73

 • कार्यकारी (विद्युत) - 42

 • कार्यकारी (सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन) - 87

 • कार्यकारी (ऑपरेशन्स आणि बीडी) - 237

 • कार्यकारी (यांत्रिकी) - 03

 • कनिष्ठ कार्यकारी (विद्युत) - 135

 • कनिष्ठ कार्यकारी (सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन) - 147

 • कनिष्ठ व्यवस्थापक (सिव्हिल) - 31

 • कनिष्ठ व्यवस्थापक (ऑपरेशन्स आणि बीडी) - 77

 • कनिष्ठ व्यवस्थापक (मेकॅनिकल) -03

 • कार्यकारी (सिव्हिल) - 73

 • कार्यकारी (विद्युत) - 42

 • कार्यकारी (सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन) - 87

 • कार्यकारी (ऑपरेशन्स आणि बीडी) - 237

 • कार्यकारी (यांत्रिकी) - 03

 • कनिष्ठ कार्यकारी (विद्युत) - 135

 • कनिष्ठ कार्यकारी (सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन) - 147