आर्मीत अधिकारी व्हायचंय? मग, 'या' परीक्षा देऊ शकतात आपल्याला मोठी संधी I Indian Army | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Army
भारतीय लष्करात भरती होऊन देशाची सेवा करणं हे प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं.

आर्मीत अधिकारी व्हायचंय? मग, 'या' परीक्षा देऊ शकतात आपल्याला मोठी संधी

Indian Army Recruitment 2021 : भारतीय लष्करात (Indian Army) भरती होऊन देशाची सेवा करणं हे प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं, परंतु यातील काही तरुणच या टप्प्यापर्यंत पोहोचतात. लष्करात भरती होण्यासाठी बहुतेक तरुण राष्ट्रीय संरक्षण अकादमीची (NDA) प्रवेश परीक्षा देतात. या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची संख्या सुमारे 4 लाख आहे, परंतु यापैकी केवळ 400 उमेदवार निवडले गेले आहेत. दरम्यान, जे उमेदवार एनडीएची परीक्षा उत्तीर्ण करू शकले नाहीत, त्यांच्यासाठी सैन्यात अधिकारी होण्याची चांगली संधीय. जर, तुम्ही 14 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या एनडीए आणि एनए प्रवेश परीक्षेत भाग घेणार असाल, तर आपल्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.

सीडीएस परीक्षा (CDS Examination) : जर तुम्हाला पदवीनंतर सैन्यात अधिकारी व्हायचं असेल, तर तुम्ही संयुक्त संरक्षण सेवा (सीडीएस) परीक्षेला बसू शकता. ही परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. सीडीए (CDA) परीक्षेद्वारे इंडियन मिलिटरी अॅकॅडमीमध्ये (आयएमए) (IMA) सामील होण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयांत पदवीधर असणं आवश्यक आहे. तर नेव्हीसाठी अभियांत्रिकी पदवी, एअरफोर्स अकादमीच्या परीक्षेसाठी बारावीत गणित आणि भौतिकशास्त्रासह पदवी प्राप्त करणं आवश्यक आहे.

टीईएस परीक्षा (10+2) TES Examination : जर तुम्हाला 12 वी नंतर भारतीय सैन्यात भरती व्हायचं असेल, तर तुम्ही 10+2 टेक्निकल एंट्री स्कीमसाठी (TES) अर्ज करू शकता. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह 10+2 (12 वी) परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 10+2 टेक्निकल एंट्री स्कीमसाठी अर्ज करू शकतात.

टीईएस परीक्षा TES Examination (पदवीधर) : जर तुम्ही अभियांत्रिकीचे विद्यार्थी असाल, तर तुम्ही अभियंत्यासाठी भारतीय सैन्य तांत्रिक प्रवेशाद्वारे सैन्यात अधिकारी बनू शकता. या परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेली असावी.

इतर भरती : वर नमूद केलेल्या प्रवेश परीक्षांव्यतिरिक्त भारतीय लष्करात शॉर्ट सर्व्हिस कमिशन Short Service Commission (एसएससी) आणि टेरिटोरियल आर्मी परीक्षांद्वारे उमेदवारांना प्रवेश दिला जातो. तसेच, लष्कर या भरतींसाठी वेळोवेळी अधिकृत वेबसाइटवर माहिती प्रसिद्ध करत असते.