esakal | भारतीय सैन्यदलात नोकरीची संधी; लेफ्टनंट पदावर मिळणार चान्स I Indian Army
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Army
भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी!

भारतीय सैन्यदलात नोकरीची संधी; लेफ्टनंट पदावर मिळणार चान्स

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

Indian Army Recruitment 2021 : भारतीय सैन्यात (Indian Army) भरती होऊन देशसेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आर्मीनं टेक्निकल एन्ट्री स्कीमसाठी (TES) नुकतीच भरती काढलीय. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अधिकृत वेबसाइटवर joinindianarmy.nic.in अर्ज करू शकतात.

भारतीय लष्करानं 9 ऑक्टोबर 2021 रोजी रोजगार वर्तमानपत्रात अधिसूचना प्रकाशित केली होती. दरम्यान भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात. उमेदवाराला या विषयांमध्ये किमान 60% गुण असणं आवश्यक आहे. तसेच TES-46 अभ्यासक्रमातून TES मध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE Mains अनिवार्य असेल.

हेही वाचा: Railway Jobs 2021 : रेल्वेत 'या' पदांसाठी परीक्षा न घेता भरती

या अभ्यासक्रमासाठी 90 जागा रिक्त आहेत. अभ्यासक्रमाची 4 वर्षे यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर, कॅडेट्सना सैन्यात लेफ्टनंट पदावर कायमस्वरूपी कमिशन दिलं जाईल. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 नोव्हेंबर 2021 आहे. तसेच इच्छुक उमेदवाराचे वय 16½ पेक्षा जास्त आणि 19½ पेक्षा कमी असावे. उमेदवाराचा जन्म 2 जुलै 2002 पूर्वी आणि 1 जुलै 2005 नंतरचा नसावा.

हेही वाचा: FCI मध्ये 860 जागांसाठी बंपर भरती; 8 वी विद्यार्थ्यांनाही करता येणार अर्ज

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना भरती महासंचालनालयाच्या www.joinindianarmy.nic.in वेबसाइटवर 'ऑनलाइन' अर्ज करावा लागेल. भरती महासंचालनालय, एकात्मिक मुख्यालय, संरक्षण मंत्रालय (आर्मी) येथे अर्जाची तपासणी केली जाईल आणि त्यानंतर उमेदवाराची निवड केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या अर्जदारांना डिसेंबर 2021 पासून SSB मुलाखतीसाठी बोलावले जाईल. शिवाय, उमेदवारांना दोन टप्प्यातील निवड प्रक्रियेतून जावं लागेल, असंही अधिसूचनेत नमूद केलंय.

loading image
go to top