
Eligibility Criteria For Railway Player Jobs
Esakal
Railway Player Job Vacancy 2025 : जर तुम्ही खेळाडू असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दक्षिण रेल्वेने आपल्या स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत नोकरीची भरती जाहीर केली आहे. ही संधी खास करून त्या सर्व खेळाडूसाठी आहे ज्यांनी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडली आहे. आता तुम्ही तुमच्या खेळाच्या कौशल्याच्या जोरावर थेट सरकारी नोकरी मिळवू शकता आणि त्यासाठी कोणतीही लेखी परीक्षा देण्याची गरज नाही.