esakal | Virologist मध्ये बनवा करिअर, 40 ते 50 लाखांपर्यंत मिळेल पगार
sakal

बोलून बातमी शोधा

Virologist

Virologist मध्ये बनवा करिअर, 40 ते 50 लाखांपर्यंत मिळेल पगार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : विज्ञानाच्या शाखांतर्गत व्हायरसची रचना आणि त्यांचे कार्य व विषाणूंच्या संसर्गामुळे होणा-या रोगांचा अभ्यास केला जातो. त्याला व्हायरोलॉजी किंवा विषाणूशास्त्र असेही म्हटले जाते. या क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्याला व्हायरोलॉजिस्ट म्हणतात. आण्विक स्तरावर विषाणूशास्त्रज्ञ या प्रक्रियेचा अभ्यास करतात. व्हायरलॉजिस्टची कारकीर्द खूप आव्हानात्मक असून यात काम करणाऱ्यांना या क्षेत्राबद्दल सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. विषाणूशास्त्रज्ञ प्रामुख्याने प्रयोगशाळेत सर्वाधिक काम करतात. व्हायरोलॉजिस्ट होण्यासाठी जीवशास्त्रातील पदवी असणे आवश्यक आहे.

व्हायरस जगातील बहुतेक धोकादायक आजाराचे कारण आहे. विषाणूमुळे जगात बरेच नाश झाले आहेत. म्हणूनच, विषाणूच्या या क्षेत्रात कारकीर्दीची भरपूर संधी आहे. ही एक उदयोन्मुख कारकीर्द असून या क्षेत्रात स्पर्धा खूपच कमी आहे.

पात्रता

या क्षेत्रात करिअर करण्यासाठी उमेदवारांकडे जीवन विज्ञान किंवा बायोकेमिस्ट्रीमधील पदवी असणे आवश्यक आहे. मास्टर लेव्हल प्रोग्राम्समध्ये कोर्सवर्क, लॅब स्टडी आणि रिसर्च यांचा समावेश आहे. हा 12 महिन्यांचा किंवा त्याहून अधिकचा प्रोग्राम असू शकतो. संशोधन तज्ञ होण्यासाठी विद्यार्थ्यांना पीएचडी असणे आवश्यक आहे. विषाणूशास्त्रातील बहुतेक प्रोग्राम आण्विक जीवशास्त्र किंवा वैद्यकीय पदवीधर कार्यक्रमाचा भाग असतात.

संस्था

भारतातील अनेक विद्यापीठे एमएससी इन व्हायरोलॉजी या क्षेत्रात प्रवेश देतात. जसे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे यांच्या सहकार्याने), महाराष्ट्र, मणीपाल युनिव्हर्सिटी, कर्नाटक, अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी, उत्तर प्रदेश, श्री वेंकटेश्वर विद्यापीठ, आंध्र प्रदेश इत्यादी

जगातील बरीच विद्यापीठे पदवी स्तरावरील विषाणूचा अभ्यासक्रम घेत आहेत. त्यापैकी हार्वर्ड विद्यापीठ यूएसए, पेनसिल्व्हेनिया यूएसए, ग्लासगो विद्यापीठ यूके, इम्पीरियल कॉलेज लंडन यूके, केंब्रिज विद्यापीठ यूके, कॅनडा टोरंटो विद्यापीठ, मेलबर्न विद्यापीठ ऑस्ट्रेलिया इत्यादी.

Online Class मध्ये मन लागत नाही? मग, 'या' खास टिप्सचा जरुर वापर करा

तुम्हाला नोकरी कुठे मिळेल?

विषाणूविज्ञानामध्ये बरेच रोजगार उपलब्ध आहेत. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात देखील. हॉस्पिटल, डायग्नोस्टिक सेंटर, फार्मास्युटिकल कंपन्या, संशोधन संस्था, सरकारी संस्था, अन्न उद्योग, शेती इत्यादींमध्ये विषाणू तज्ञांकरिता विपुल संधी आहेत.

पगार

व्हायरलॉजीच्या क्षेत्रात पगाराचे पॅकेज बरेच चांगले आहे. दहा लाख ते 40-50 लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज संस्थांकडून दिले जाते.

loading image
go to top