
भारतीय सैन्यात दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी
मुंबई : भारतीय सैन्यात दाखल होऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय लष्कराच्या साउथर्न कमांड मुख्यालयाने विविध पदांसाठी भरती सुरू केली आहे. यासाठी इच्छुक उमेदवार १४ जूनपर्यंत ऑफलाइन अर्ज करू शकतील. ड्रायवर ऑर्ड जीडीई आणि लोअर डिवीजन क्लर्क या पदांवर भरती केली जाणार आहे.
भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार ५८ पदांवर भरती केली जाणार आहे. यात ४६ पदे महिला सफाई कामगारांसाठी, ९ पदे लोअर डिविजन क्लर्कसाठी, २ पदे ड्रायवर ऑर्ड जीडीईसाठी आणि १ पद पुरूष सफाई कामगारासाठी आहे.
शैक्षणिक पात्रता
सफाई कामगार आणि ड्रायव्हर पदासाठी काम करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. एलडीसी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून १२वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आणि त्यांना computer typing येणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षे असावे. आरक्षित वर्गांतील उमेदवारांनी कायद्यानुसार सूट दिली जाईल.
या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी "कमाडेंट, कमांड अस्पताल (एससी), पुणे" येथे पोस्टल ऑर्डर म्हणून १०० रुपये शुल्क पाठवावे. सोबत दोन passport size photo पाठवावेत.