esakal | भारतीय सैन्य दलात NCCच्या कॅडेट्ससाठी विशेष भरती
sakal

बोलून बातमी शोधा

indian army

भारतीय सैन्य दलात NCCच्या कॅडेट्ससाठी विशेष भरती

sakal_logo
By
अक्षता पवार

पुणे : भारतीय सैन्यदलातर्फे विशेष प्रवेश योजने अंतर्गत राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया महिला व पुरुष उमेदवारांसाठी असून येत्या ३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

हेही वाचा: 'महाराष्ट्र बंद'ला भाजपचा विरोध; जबरदस्तीनं दुकानं बंद केल्यास...

‘एनसीसी स्पेशल एंट्री’च्या ५१ व्या कोर्ससाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. यामध्ये ५५ जागा उपलब्ध करण्यात आल्‍या असून ४५ जागा पुरुष तर ४ जागा महिला उमेदवारांसाठी ठेवण्यात आली आहे. तसेच युद्धात हुतात्मा झालेल्यांच्‍या मुला-मुलींसाठी ६ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

देशातील कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. यासाठी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे तसेच, एनसीसीचे ‘सी सर्टिफिकेट’ असणे आवश्‍यक आहे. तर वयोमर्यादा ही १९ ते २५ पर्यंत ठेवण्यात आली आहे. या प्रक्रियेदरम्यान निवड झालेल्या उमेदवारांना चेन्नई येथील ‘ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी’ (ओटीए) येथे ४९ आठवड्यांच्या लष्करी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येईल.

हेही वाचा: HSC, SSC Exam : फॉर्म नंबर १७ भरण्यास २७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

याबाबतच्या अधिक माहितीसाठी तसेच अर्ज करण्याकरिता इच्छुक उमेदवारांना सैन्यदलाच्या joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येईल.

loading image
go to top