आंतरराष्ट्रीय वैद्यक प्रवेशासाठी मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Tushar Devras

दर्जेदार आणि किफायतशीर दरातील वैद्यकीय शिक्षणासाठी आता बहुतेक पालक परदेशातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशाला प्राधान्य देत आहे.

आंतरराष्ट्रीय वैद्यक प्रवेशासाठी मार्गदर्शन

पुणे - वैद्यकीय शिक्षणासाठी तुम्ही जर परदेशातील संधींच्या शोधात असाल, तर दर्जेदार शिक्षण देणारी महाविद्यालये आणि केंद्र सरकारचे नवे नियम माहीतच असायला हवे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विश्वासार्ह वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यासाठी सकाळ विद्या आणि ॲस्ट्यूट करिअर कौन्सिलिंग ॲकॅडमीच्या वतीने रविवारी (ता. ६) विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

दर्जेदार आणि किफायतशीर दरातील वैद्यकीय शिक्षणासाठी आता बहुतेक पालक परदेशातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशाला प्राधान्य देत आहे. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरची अनिश्चितता आणि केंद्र सरकारचे नवे नियम माहीत नसल्याने अनेक विद्यार्थी सध्या संभ्रमावस्थेत आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग सुकर व्हावा म्हणून ॲकॅडमीचे संचालक डॉ. तुषार देवरस विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करणार आहे.

या प्रश्नांची मिळणार उत्तरे...

  • परदेशातील वैद्यकीय शिक्षण परवडते का?

  • कोणत्या देशातील महाविद्यालयांत प्रवेश घ्यावा?

  • सरकारचे वैद्यकीय शिक्षणाबद्दलचे नवे नियम काय?

  • आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती आणि योजनांची माहिती

हे लक्षात ठेवा...

  • केव्हा - रविवारी (ता. ६), सकाळी ११ वाजता

  • कोठे - बाल शिक्षण मंदिर, मयूर कॉलनी, कोथरूड

  • कोणासाठी - वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी व त्यांचे पालक

आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेशाबाबत पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही पुरेशी माहिती नसते. केंद्र सरकारची नवी धोरणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेशाच्या संधींबद्दल आम्ही मार्गदर्शन करणार आहोत. मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांनाही परवडेल अशा शैक्षणिक संधींबद्दल माहिती देण्यात येईल.

- डॉ. तुषार देवरस, संचालक, ॲस्ट्यूट करिअर कौन्सिलिंग ॲकॅडमी