

US Visa Rules
sakal
पुणे : भारतातून अमेरिकेत नोकरीला जाण्यासाठी एच-वन बी व्हिसा हा मुख्य स्रोत असून, त्याद्वारे भारतीय आयटीयन्स अमेरिकेत नोकरीला जात आहेत. मात्र, या व्हिसाच्या शुल्कात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास भारतातून अमेरिकेच्या आयटी क्षेत्रात नोकरीला जाणाऱ्यांची संख्या ९० टक्यांपर्यंत कमी होणार आहे.