अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने आपल्या शेवटच्या कार्याकाळात मोठा निर्णय घेतला आहे. बायडन प्रशासनाने H-1B व्हिसाचे नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अमेरिकन कंपन्यांना विशेष कौशल्य असलेल्या परदेशी कामगारांना कामावर ठेवणे सोपे होणार आहे. बिडेन प्रशासनाच्या या निर्णयानंतर H-1B स्टुडंट व्हिसा H-1B व्हिसामध्ये बदलण्यास सोपे होणार आहे.
बायडन सरकारच्या या निर्णयचा फायदा हजारो भारतीय तांत्रिक व्यावसायिकांना होण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिकेत सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारीला पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.