‘नर्सिंग’मधील करिअर

पेशंटला सलाइन लावणे, मलमपट्टी करणे, डॉक्टरांनी सूचित केलेली औषधे रुग्णाला देणे अशी अनेक कामे नर्सेस करतात.
health sector career options in nursing women
health sector career options in nursing womenSakal

- प्रा. विजय नवले

वैद्यकीय क्षेत्रातील सेवांमध्ये डॉक्टरचे कार्य प्रमुख मानले जाते. तरीही डॉक्टर एकट्याने सर्व वैद्यकीय सेवा पुरवू शकणार नाहीत, कारण शुश्रूषेचे काम साहाय्यकांनी करणे अपेक्षित असते. वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णसेवा करण्याचे हे महत्त्वाचे काम नर्सेस करत असतात.

पेशंटला सलाइन लावणे, मलमपट्टी करणे, डॉक्टरांनी सूचित केलेली औषधे रुग्णाला देणे अशी अनेक कामे नर्सेस करतात. त्यासाठीचे शास्त्रोक्त वैद्यकीय शिक्षण घेणे अपेक्षित असते. नर्सिंग शिक्षणातील बारावीनंतरच्या शिक्षणाचा आढावा घेऊया.

कालावधी व पात्रता

बीएससी नर्सिंग हा बारावीनंतर चार वर्षांचा पदवी कोर्स आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायॉलॉजीसह बारावी सायन्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ‘नीट’ची परीक्षा ही प्रवेशासाठीची परीक्षा आहे. काही ठिकाणी नीट परीक्षा अनिवार्य नसते. मुली आणि मुले दोघांसाठी हे करिअर आहे.

विषय

नर्सिंग सर्व्हिसेस, सेवाशुश्रूषा, फिजिऑलॉजी, ॲनाटॉमी, बायोकेमिस्ट्री, फार्म्याकोलॉजी, मायक्रोबायॉलॉजी, न्यूट्रिशन, डाएटेटिक्स, सायकॉलॉजी, सोशॉलॉजी, चाइल्ड हेल्थ नर्सिंग, मेडिकल सर्जिकल नर्सिंग, मिडवायफरी नर्सिंग, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, ऑक्युपेशनल थेरपी, ॲनास्थेशिया, उपकरणे वापरण्याच्या पद्धती, रक्ताचे सॅम्पल घेण्याच्या पद्धती, सुपरव्हिजनच्या पद्धती, फॅमिली वेल्फेअर प्रोग्राम इत्यादी.

स्वरूप

चार वर्षांचा कोर्स आठ सेमिस्टरमध्ये घेतला जातो. थेअरी अध्ययनासोबतच प्रॅक्टिकल्स अत्यंत महत्त्वाची असतात. संबंधित प्रयोगशाळेत, तसेच प्रत्यक्ष रुग्णालयात प्रात्यक्षिक शिक्षण मिळते. डॉक्टरांचे मार्गदर्शन, आरोग्यविषयक विविध परिस्थिती, उपकरणांचा वापर, हॉस्पिटलमधील उपचार पद्धती या सर्वांचा जवळून अभ्यास करता येतो.

नोकरी कुठे?

हॉस्पिटल्स, क्लिनिक्स, नर्सिंग होम, पुनर्वसन केंद्र, मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस, केंद्र आणि राज्य सरकारच्या नर्सिंगमधील संधी, रेल्वे, शासकीय उपक्रमांमधील जागा, आरोग्य विभाग, होम हेल्थ केअर सर्व्हिसेस, शिक्षण, प्रशिक्षण, केअर सेंटर, फार्मा कंपनी या ठिकाणी नर्सेसना नोकरीची संधी मिळते.

उच्च शिक्षणाच्या संधी

बीएससीनंतर एमएससी करता येते. मेडिकल सर्जिकल नर्सिंग, पेडियाट्रिक नर्सिंग, गायनॅकॉलॉजिकल नर्सिंग, सायकियाट्रिक नर्सिंग आदी विषयांमध्ये उच्च शिक्षण घेता येते. यानंतर पीएचडीदेखील करता येते.

मास्टर इन पब्लिक हेल्थ हा पर्यायदेखील बीएससीनंतर उपलब्ध आहे. डिप्लोमा इन क्रिटिकल केअर, डिप्लोमा इन नर्सिंग ॲडमिनिस्ट्रेशन, डिप्लोमा इन कार्डिओ व्हॅस्कुलर नर्सिंग, इमर्जन्सी नर्सिंग हे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्ससुद्धा करता येतील.

कौशल्ये

सेवावृत्ती, आरोग्यविषयक आवश्यक ज्ञान, उपचारपद्धतीची संपूर्ण माहिती, निरीक्षणशक्ती, भावनिक बुद्ध्यांक चांगला असावा, अडचणीच्या प्रसंगी न डगमगता सेवा देता यावी, रुग्ण व त्याच्या नातेवाइकांशी संवाद साधताना मानसशास्त्रीय दृष्टिकोन उत्तम असावा, संभाषणकौशल्ये चांगली असावीत,

सकारात्मक वृत्ती, टापटीपपणा, स्वच्छता, शुश्रूषा करताना ममत्वभाव, तांत्रिक कामे सहजतेने आणि अचूकपणे करता यावीत, डॉक्टर-वरिष्ठ यांच्याशी पेशंट व संबंधित कामांविषयीचा संवाद साधता यावा आणि फीडबॅक वेळेत घेता यावा, रुग्णाचे आरोग्य, सुरक्षितता या गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या मानताना वेळेचे नियोजन करता यावे.

स्कोप करिअरचा

आरोग्य, आयुष्य, सुरक्षितता, आजारांचा सामना, प्रतिकूल परिस्थिती यांविषयी काहीही घडल्यास डॉक्टर, इस्पितळे, उपचारपद्धती उपलब्ध असतात. हल्ली अशा आरोग्यविषयक सोयी मोठ्या प्रमाणात विकसित होत आहेत. देशातील लोकसंख्या पाहता आरोग्यविषयक सुविधा तत्परतेने आणि सातत्याने ‘अलर्ट मोड’वर असाव्या लागतात.

त्यामुळे रुग्णालयांची संख्या वाढते आहे. त्यामुळे या रचनेत नर्सेसची मागणी देखील जास्त आहे. आरोग्याच्या बाबतीत कुठेही कमतरता नको, त्यामुळेदेखील या वैद्यकीय सुविधा वाढत असल्याने यापुढेही नर्सेसच्या सेवांची गरज वाढत राहील. त्या अर्थाने नर्सिंगला स्कोप आहेच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com