यशाचे पाच नियम जे आपल्याला हमखास यश मिळवून देतील ! 

Success.
Success.

सोलापूर : आपले यश आणि अपयश यादरम्यान केवळ आत्म-शिस्त किंवा स्वयंशिस्त इतके अंतर आहे. सुदैवी लोक स्वयंशिस्तीत पारंगत असले तरी दुर्दैवी लोक स्वतःला शिस्त लावण्यात फारच अपयशी ठरतात. आपण द्वितीय श्रेणीत असल्यास निराश होऊ नका, या पाच अचूक नियमांना आपल्या जीवनाचा एक भाग बनवल्यास आपण देखील यशस्वी होऊ शकता. 

यशाचा पहिला नियम : आपल्या योजनेवर ठाम राहा 
आपण आपल्या योजनेवर ठाम राहाल तरच आपण यशस्वी होऊ शकता. म्हणजेच आधीच ठरविलेल्या योजनेनुसार कार्य करा. आपल्या आहार योजनेचा नाश करेल अशी मिष्टान्नं खाण्याचा मोह होत असेल, तर अस्वस्थता सहन करण्याचा सराव करा. म्हणजेच या गोष्टी करण्यापासून स्वत:ला खंबीरपणे रोखा. जरी लोक बऱ्याचदा स्वत:ला पटवून देतात की त्यांनी ते एकदाच केले तर ते मदत करेल, परंतु संशोधनातून उलट दिसून येते. जेव्हा आपण हार मानता तेव्हा प्रत्येक वेळी आपले आत्मनियंत्रण कमी होते. म्हणून जर आपल्याला एखादे काम करायचे नसेल तर ते कोणत्याही किमतीवर करू नका. एकदा, दोनदा असे काहीही असू नये. जरी आपण तीव्र अस्वस्थता अनुभवत असाल तरीही, अस्वस्थता सहन करण्याचा सराव करा. 

यशाचा दुसरा नियम : स्वतःशी बोला, आपल्या योजनेबद्दल मनाला पटवून द्या 
फक्त असे गृहीत धरले की आपणास हे करायचे नसेल तर ते करू नका. आपण ज्या गोष्टी करण्यापासून स्वत:ला रोखता त्याबद्दल मन सतत विचार करते. आपले चंचल मन आपण ते कार्य का करावे, हे फिरून पुन्हा एकदा सांगायचा प्रयत्न करेल. जेव्हा मन आपणास मोहात टाकण्याचा प्रयत्न करीत असेल, तेव्हा आपण मनाला पटवून देण्याचा देखील प्रयत्न केला पाहिजे. काही अतिशय व्यावहारिक आणि स्वत:ची प्रेरणा देणारी कोट्‌स लक्षात ठेवा. शक्‍य असल्यास अशा ठिकाणी लिहा, जिथून आपण चंचल मनाच्या मोहात डगमगू शकता. हे कोट्‌स अशा क्षणी मोहांना प्रतिकार करण्यास उपयुक्त आहेत. "मी हे करू शकतो' किंवा "मी माझ्या उद्दिष्टांसाठी मी एक चांगले काम करीत आहे' असे ठरवल्यास आपण ट्रॅकवर राहू शकता. 

यशाचा तिसरा नियम : ध्येय पूर्ण झाल्यानंतर आनंद साजरा करा 
आपण कोणतेही काम करण्याचे किंवा न करण्याचे ठरविले असेल तर आपण त्यापासून काय प्राप्त करू इच्छिता हे लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या लक्ष्याच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करून मोह कमी करता येतो. महिन्याचे बजेट बिघडू शकते अशा वस्तू विकत घेण्याचा मोह कमी होईल. म्हणजेच, आपल्या सद्य उद्दिष्टापर्यंत पोचल्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या आनंदाची कल्पना करा. 

यशाचा चौथा नियम : कठीण परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करा 
बऱ्याच वेळा आपण आपल्या उद्दिष्टांपासून सहजतेने विचलित होतो, कारण आपण स्वतःला अशा स्थितीत ठेवतो जेथे विचलित होणे सोपे जाते. उदाहरणार्थ, आपण आपली उधळपट्टी कमी करण्याचा निर्धार केला आहे. कोणत्याही परिस्थितीत हे नियंत्रित केले पाहिजे. मग मित्रांसह बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. आता आपण मित्रांसह बाहेर जाण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही. जर आपल्याला माहीत असेल की आपण मित्रांसह बाहेर जाण्यासाठी बरेच पैसे खर्च करू शकता तर आपल्याबरोबर जास्त पैसे घेऊ नका. जर मोह सोडणे अशक्‍य असेल तर अवघड होईल. म्हणजेच, जेव्हा आपण ध्येयातून विचलित होऊ शकता अशा परिस्थितीत स्वत:ला मोहापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. 

यशाचा पाचवा नियम : चुकांची पुनरावृत्ती टाळा 
आपण आपली चूक पुन्हा का करू इच्छित नाही त्या सर्व कारणांची यादी बनविली पाहिजे. ही यादी आपल्याबरोबर ठेवा. जुन्या वर्तणुकीच्या सवयीकडे परत येण्याचा मोह होत असेल तेव्हा ही यादी वाचा. उदाहरणार्थ, जेवणानंतर आपण फिरायला का जावे यामागील कारणांची यादी करा. जेव्हा आपल्या मनाला व्यायामाऐवजी आराम करण्याची आणि टीव्ही पाहण्याची इच्छा असेल तर आपण व्यायाम न केल्यास काय होईल हे तत्काळ त्वरित वाचा. अशी छोटी तपासणी प्रणाली आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com