esakal | मानवी संस्कृती सोबत टिकणारं एकमेव क्षेत्र; जाणून घ्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील संधी
sakal

बोलून बातमी शोधा

Hospitality

मानवी संस्कृती सोबत टिकणारं एकमेव क्षेत्र; जाणून घ्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील संधी

sakal_logo
By
अमित उजागरे

प्रयोग शाळेची उपकरणं आणि अॅवोकॅडो, लिंबू आणि आइस्क्रीमसह ताज्या अन्नाची शिपमेंट घेऊन स्पेसएक्स रॉकेट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांसाठी (ISS) साठी २ ऑगस्ट २०२१ रोजी रवाना झाले होते. याद्वारे हॉस्पिटॅलिटी (आदरातिथ्य) क्षेत्राची सेवा आता अवकाशातही पोहोचली आहे. एकूणच हॉस्पिटॅलिटी क्षेत्र हजारो वर्षांपासून अस्तित्वात असून मानवाच्या शेवटापर्यंत ते अबाधित राहील. आदरातिथ्याची संकल्पना प्राचीन संस्कृतींमध्ये सापडते. 'अतिथी देवो भव' या तत्त्वावर ही संकल्पना भारतीय संस्कृतीत रुजली आहे. ग्रीक लोकांसाठी झेनिया ही पाहुणचाराची संकल्पना आहे.

ग्लोबल हॉस्पिटॅलिटी मार्केट 2020 मध्ये 3486.77 अब्ज डॉलर्स वरून 2021 मध्ये 4132.5 अब्ज डॉलर्स पर्यंत वाढलं आहे. ते 18.5 टक्केच्या चक्रवाढ वार्षिक वाढीच्या दरानं (सीएजीआर) वाढणं अपेक्षित आहे. 2020 पासून कोविडने या उद्योगा फटका बसला असला तरी लवकरच हे क्षेत्र जोर पकडेल. हॉस्पिटॅलिटी क्षेत्र अश्या काही उद्योगांपैकी एक आहे जे प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात कुठल्या ना कुठल्या प्रकारे स्पर्श करते.

हॉस्पिटॅलिटी उद्योगाबद्दल अनेक गैरसमज आहेत, जे सहजपणे दूर केले जाऊ शकतात.

 1. केवळ महिलाच या उद्योगात काम करतात : खरं तर, हॉस्पिटॅलिटी क्षेत्र काही मोजक्या उद्योगांपैकी एक आहे ज्यामध्ये लिंग संतुलन (Gender Balance) योग्य आहे. ही गोष्ट निंदनीय असण्यापेक्षा अधिक प्रशंसनीय आहे.

 2. या क्षेत्रामध्ये दीर्घ आणि अनियमित कामाचे तास : हे क्षेत्र खरोखरच 24 X 7 काम करते आणि विशेषतः सुट्टीच्या दिवशी ह्या क्षेत्रातील व्यक्ती इतरांच्या सुट्टीची स्वप्ने साकार करण्यासाठी अधिक मेहनत घेतात. परंतू या उद्योगात अनेक पदं अशी आहेत जी कामामध्ये संतुलन राखतात.

 3. आतिथ्य कामगार अशिक्षित आहेत : ही एक कपोकल्पित गोष्ट आहे. या क्षेत्रात काही पदं अशी आहेत ज्यांना उच्च शिक्षणाची आवश्यकता नसते. परंतू बरीच पदे अशी आहेत ज्यांमध्ये त्यांना उच्चस्तरीय कौशल्ये आवश्यक असतात. परंतू या उद्योगातील महत्त्वपूर्ण पदांसाठी कौशल्ये, ज्ञान तर आवश्यक आहेच पण अत्यंत महत्वाचे असे ग्राहक सेवा कौशल्यही आवश्यक आहे.

 4. हॉस्पिटॅलिटी नोकऱ्यांमध्ये चांगलं उत्पन्न मिळत नाही : हा समज काही पदांसाठी खरा असू शकतो, परंतू या उद्योगातील वरिष्ठ पदांना मागणी आहे आणि चांगले वेतन आहे. त्यामुळे या पदांकडे जाण्यासाठी योग्य शिक्षण आणि कौशल्य विकास महत्त्वाचं आहे.

 5. इथे कमी दर्जाची कामं असतात : इतर अनेक उद्योगांमध्येही अशी अनेक पदे आहेत जी सामान्य दर्जाची असतात. परंतू महसूल व्यवस्थापन, पाककृती, इव्हेंट प्लॅनिंग, संशोधन आणि विकास पदांमध्ये सर्जनशीलता असते. या उद्योगाचे हे सौंदर्य आहे की यात प्रत्येकासाठी काही ना काहीतरी करण्यासारखं आहे.

 6. तुमचं वजन कमी होईल किंवा वाढेल : विचित्र तास, अनियमित वेळा आरोग्यासाठी अनुकूल नसतात. परंतू बहुतांश आतिथ्य व्यावसायिक दिवसभर सतत पायावर उभे असतात किंवा इतर क्षेत्रातही सक्रिय असतात. स्वतःच्या वजनाशी संघर्ष जवळजवळ सर्व क्षेत्रांमध्ये आहे, फक्त आदरातिथ्य क्षेत्रांमध्येच आहे असं नाही.

तुम्ही फक्त हॉटेल्समध्ये काम कराल : हा समजही चुकीचा आहे. अशी अपेक्षा आहे की 2030 पर्यंत 9 पैकी 1 नोकरी ही या क्षेत्राशी संबंधित असेल. हॉटेल्स हा त्याचा एक छोटासा भाग आहे. आरोग्य संवर्धन उद्योग, मनोरंजन, लक्झरी, अन्न आणि पेये आणि बरीच क्षेत्रे आहेत ज्यामध्ये आदरातिथ्य कार्यक्रमांमध्ये शिकत असलेल्या अनेक कौशल्यांची खूप निकड आहे. आदरातिथ्य कार्यक्रमांमध्ये आपण शिकत असलेली अनेक कौशल्ये रिटेल किंवा कोणत्याही ग्राहक सेवा उद्योगासाठी हस्तांतरणीय असतात.

टेक्नोलॉजी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील नोकऱ्या घेईल : टेक्नॉलॉजीने आदरातिथ्य मध्ये खरोखरच खूपच बदल झाला आहे. परंतू हायपर पर्सनलाइज्ड सेवेच्या अपेक्षेला मानवी स्पर्शाची नितांत आवश्यकता आहे. संवेदनशीलता आणि सर्जनशीलता हे गुण कधीही यंत्रमानवात असू शकत नाही. सर्जनशीलता आणि मानवी स्पर्शाला या क्षेत्रात पुरेसा वाव आहे.

एकूणच हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात नेमके काय समाविष्ट आहे? फक्त हॉटेलमध्ये काम करणे किंवा शेफ म्हणून काम करणे आहे का? की अन्य खूप काही आहे? या लेखासाठी संशोधन करताना, आम्ही डॉ. कालिंदी भट यांच्याशी संवाद साधला. ज्या आदरातिथ्य क्षेत्रासाठी एआयसीटीई च्या समितीवर कार्यरत आहेत. यावेळी डॉ. कालिंदी भट यांनी हॉस्पिटॅलिटी उद्योगाच्या 5 मुख्य विभागांचा संदर्भ दिला यामध्ये...

 1. अन्न आणि पेय सेवा

 2. प्रवास आणि पर्यटन

 3. निवास किंवा फ्रन्ट ऑफिस

 4. बैठका किंवा अन्य कार्यक्रम

 5. मनोरंजन आणि करमणूक उपक्रम

हॉस्पिटॅलिटी मधील करियर्स जवळजवळ सर्व स्तरावर आहेत. हे काही मोजक्या क्षेत्रांमधील असे क्षेत्र आहे जिथे अशिक्षित आणि अकुशल व्यक्तींपासून उच्च शिक्षित आणि उच्च कुशल व्यक्तींपर्यंत प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहे. इथे पुरेश्या वेतन प्राप्तीसाठी, सल्ला असा आहे की आपण एकतर एक विशिष्ट कौशल्य प्राप्त करा किंवा क्षेत्रीय ज्ञान आणि महत्वपूर्ण कौशल्यांची योग्य सांगड घालावी.

कौशल्य कार्यक्रम राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या (NSDC) पुढाकाराद्वारे किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांद्वारे, सार्वजनिक किंवा खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. हे कार्यक्रम कौशल्यांवर लक्ष केंद्रित करतात आणि वर नमूद केलेल्या 5 क्षेत्रांपैकी एका क्षेत्रात काही विशिष्ट कौशल्यांसह हॉस्पिटॅलिटी उद्योगात सर्वात जलद प्रवेश देतात. NEP2020 अंतर्गत तुम्हाला शाळा आणि हायस्कूल स्तरावरून आदरातिथ्याशी संबंधित विशेष विषय निवडण्याची सोय आहे. आपल्या शैक्षणिक संस्थेमध्ये या क्षेत्राची लवकर अनुभूती देण्यासाठी असे काही पर्याय उपलब्ध असल्यास ते तपासून पाहणं गरजेचं आहे.

आदरातिथ्य क्षेत्रातील प्रवास आणि पर्यटन पर्यटनाविषयी कार्यक्रम विशेषतः विशेष संस्थांद्वारे दिले जातात, ते असे...

 1. पर्यटन व्यवस्थापन

 2. एव्हिएशन व्यवस्थापन

 3. पर्यटन अभ्यास

 4. प्रवास ब्लॉगिंग

आदरातिथ्याचा भाग असला तरी प्रवास आणि पर्यटन हे स्वतःच एक मोठे क्षेत्र आहे. आम्ही या क्षेत्राबद्दल आणखी काही सविस्तरपणे भाष्य करु.

लेखाचा उर्वरित भाग प्रवास आणि पर्यटनाशिवाय उर्वरित हॉस्पिटॅलिटी उद्योगावर केंद्रीत आहे.

कॉनराड हिल्टनचे शब्द त्यांच्या प्रसिद्ध उक्तीद्वारे आदरातिथ्याचे महत्त्व सांगतात. ते म्हणतात, "पृथ्वीला आदरातिथ्याच्या रोषणाईने आणि उबेने भरण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे."

संघटित आतिथ्य, जेव्हा आपण कोणत्याही हॉटेल, रिसॉर्ट किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी भेट देतो तेव्हा आपण अनुभवतो. डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन स्तरावरील बहुतेक पारंपारिक हॉटेल व्यवस्थापन कार्यक्रम, विशेषतः F&B, फ्रंट ऑफिस किंवा इव्हेंट्स मॅनेजमेंटवर लक्ष केंद्रित करतात. एचएससी किंवा समकक्ष शैक्षणिक कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर बहुतेक पदवी कार्यक्रमांमध्ये प्रवेश प्राप्त करू शकता. काही शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये, तुम्ही डिप्लोमा कार्यक्रम पूर्ण झाल्यानांतरीही प्रवेश प्राप्त करू शकता. शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये कोणते पर्याय दिले जातात हे तपासणे महत्वाचे आहे कारण, ते खूप भिन्न असू शकतात. जेव्हा आम्ही डॉ. सोनाली जाधव, प्राचार्य AISSMS CHMCT यांच्याशी चर्चा केली, तेव्हा त्यांनी सध्याच्या ट्रेंडवर प्रकाश टाकला. सध्याचे बहुतांशी शैक्षणिक कार्यक्रम सिद्धांत, प्रकल्प, हस्तकौशल्य व इंटर्नशिप यांची एकत्र सांगड घालतात.

अशा प्रकारे तयार केलेले कार्यक्रम आपल्याला आपल्यासाठी सर्वात योग्य उपक्षेत्रे कुठली आहेत हे शोधण्यासाठी आणखी एक मार्ग उपलब्ध करुन देतात. यामुळे तुम्ही आपल्या शेवटच्या वर्षांमध्ये या उपक्षेत्रांमध्ये तज्ज्ञ बनू शकाल. अशा कार्यक्रमांमध्ये दिले जाणारे ज्ञान, कौशल्य आणि प्रशिक्षण, हॉटेल, क्रूझ लाइनर, एअरलाइन्स व जवळजवळ सर्व ग्राहक सेवा देणाऱ्या उद्योगांमध्ये करिअरचे दरवाजे उघडतात.

15 सप्टेंबरला आमच्या 'करियर इन हॉस्पिटॅलिटी”' या इव्हेंटमध्ये सहभागी व्हा जिथे डॉ. सोनाली जाधव या सर्व संभाव्य करिअर आणि तिथे जाण्यासाठी काय गरजेचं आहे, याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.

"पाककलेसाठी लक्ष, संयम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पृथ्वीवरील वस्तूंविषयी आदरभाव असणे आवश्यक आहे. पाककला ही एक प्रकारची उपासना तसेच वसुंधरेला धन्यवाद देण्याचा एक मार्ग आहे. ”

- जुडिथ बी. जोन्स

पाककला कला हे अत्यंत सर्जनशील क्षेत्र आहे. त्याला सुस्पष्टता आणि संयमासह सर्जनशीलतेचे योग्य संतूलन आवश्यक आहे. पारंपारिक हॉटेल मॅनेजमेंट संस्था हॉस्पिटॅलिटी उद्योगाच्या सर्व पैलूंमधील मूलभूत ज्ञान आणि कौशल्ये देतात, तर पाक कला कार्यक्रम केवळ खाद्य पैलूंवर लक्ष केंद्रित करतात. पाक कला कार्यक्रम फूड सायन्स, एफ अँड बी सेवा आणि ऑपरेशन्स, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पाककृती, बेकरी आणि पेस्ट्री, वाइनसह इंटर्नशिप या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात.

जेव्हा आम्ही 'सिम्बायोसिस स्कूल ऑफ कूलिनरी आर्ट्स'चे संचालक प्रा. अतुल गोखले यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की, या उपक्षेत्रातील कार्यक्रम बहुतांशी विशिष्ट पाककृतींमध्ये ज्ञान आणि कौशल्ये तर देतातच, पण त्या बरोबर अन्नशास्त्राच्या संबंधित विविध पैलूंवर सुद्धा भर देतात. अन्नाची सुरक्षित हाताळणी, योग्य उपकरणांचा वापर, खरेदी आणि अन्नाचा साठा या पैलूंमधील कौशल्यांचा सुद्धा या शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये सहभाग असतो. त्यांची संस्था शेतापासून ते टेबलापर्यंतच्या शृंखलेमधील अनेक पैलूंसह, सेंद्रिय अन्नावर देखील लक्ष केंद्रित करते. 15 सप्टेंबर रोजी 'करियर इन हॉस्पिटॅलिटी' या कार्यक्रमात सहभागी व्हा, ज्यामध्ये प्रा. अतुल या विषयांबद्दल सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

हे क्षेत्र प्रत्येक व्यक्तीसाठी काही ना काही उपलब्ध करुन देते. परंतू हे क्षेत्र कदाचित प्रत्येकासाठी योग्य असेलच असे नाही. मला आठवते जेव्हा आम्ही या क्षेत्रातील माझ्या स्वत: च्या मुलाच्या संदर्भात डॉ. कालिंदी भट यांना भेटलो होतो. त्यांनी दीर्घ तास, सुट्टीच्या दिवशी काम आणि इतर पैलूंबद्दल देखील सांगितले जे प्रत्येकाला भावतीलच असे नाही. त्या आतिथ्य संबंधित AICTE च्या मंडळाच्या सदस्या असल्याने, भारतातील आतिथ्य शिक्षणासाठी धोरण बनवण्यामध्ये त्यांचा सहभाग असणं ही मोठी गोष्ट आहे. हॉस्पिटॅलिटीवरील कार्यक्रमाच्या वेळी आम्ही त्यांच्याशी या पैलूंवर चर्चा करणार आहोत.

हॉस्पिटॅलिटी उद्योग पुढील काही वर्षांमध्ये एक रोमहर्षक क्षेत्र बनणार आहे. कोविडमुळं निर्माण झालेल्या आव्हानांशी जुळवून घेण्यासाठी हे क्षेत्र स्वतः वेगवान रूप धारण करेल. कॉन्टॅक्टलेस डिलीव्हरी, पॅकेजिंग, हायब्रीड डाइन-इन + टेक अवे ऑप्शन्स, सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या गोष्टींचा वापर, सेवेचे हायपर पर्सनलायझेशन, यांसारख्या गोष्टींमुळे हे क्षेत्र रोमहर्षक व आमूलाग्रपणे बदलणारे क्षेत्र बनणार आहे. वाढीव ऑटोमेशनची आव्हाने आणि संधी देखील या उद्योगाचे भविष्य घडवण्यात खूप महत्वाचा वाट उचलतील.

15 सप्टेंबर रोजी 'करियर इन हॉस्पिटॅलिटी' या कार्यक्रमात सहभागी व्हा व या क्षेत्रातील दिग्गजांना हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, पाककला आणि या क्षेत्रातील शैक्षणिक दृष्टिकोनातून पुढील वर्षांमध्ये काय नियोजन केले आहे याबद्दल माहिती करून घ्या. आपण या क्षेत्राशी जोडण्यापूर्वी या क्षेत्राबद्दल अधिक ज्ञान मिळवण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करू शकता.

https://my.careerandpaths.com/share?entityType=event&entityId=613993b137e3900004420494&parentType=cap&parentId=1&sharedBy=5e97127beb8cec00147cb2fa

loading image
go to top