विद्यार्थ्यांनो! आत्मसात करा विविध कौशल्य .....

How to Develop your Skills
How to Develop your Skills

बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. पालक आणि विद्यार्थी बऱ्याच काळापासून निकालाच्या प्रतिक्षेत होते. निकाल लागला; पण पुढच्या वर्गात अॅडमिशन मिळण्यासाठी अजून काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे बारावीच्या सर्वच विद्यार्थ्यांकडे खूप वेळ उपलब्ध झाला आहे. या वेळेचा सदुपयोग कौशल्य वाढवण्यासाठी विद्यार्थी कशा प्रकारे करू शकतो, हे पाहू.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

भविष्यात उच्च शिक्षण घेऊन सरकारी किंवा खाजगी नोकरी करणे, स्वतःचा व्यवसाय सुरू करणे हे पर्याय विद्यार्थांना उपलब्ध आहेत. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी तीन कौशल्ये सर्वात महत्वाची आहेत. ती म्हणजे, संभाषण कौशल्य, नेतृत्व कौशल्य, तांत्रिक कौशल्य.सध्या बऱ्याच विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप, स्मार्टफोन, इंटरनेट उपलबध आहे. या सर्वांचा वापर करून विद्यार्थी स्वतःचे कौशल्य सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकतात.
 
1. संभाषण कौशल्य:
परिणामकारक संभाषण हा यशस्वी करिअरचा गुरुमंत्र आहे! स्वतःचे म्हणणे इतरांपर्यंत परिणामकारकरीत्या पोहचवणे गरजेचे असते. तसेच ईमेल करताना, एसएमएस करताना, थोडक्यात पण उत्कृष्टपणे व्यक्त झाले पाहिजे. मोजके शब्द वापरूनच उत्कृष्ट संभाषण होते.  यासाठी विविध कोर्सेस ऑनलाईन उपलब्ध आहेत. त्याचा वापर करून आपण संभाषण कौशल्ये विकसित करू.
 
2. नेतृत्व कौशल्य:
आजपर्यंत नेतृत्व कौशल्य म्हणजे  बाहेरच्या जगात लोकांसमोर जाऊन भाषण देणे किंवा नेतृत्व करणे असे आहे किंवा होते. पण आता विद्यार्थी ऑनलाईन  टेकनॉलॉजी, सोशल मीडियाद्वारेही नेतृत्व करू शकतात. यासाठी उत्कृष्ट संभाषण खूप गरजेचे आहे.
 
3. तांत्रिक कौशल्य:
आजच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांसाठी बरेच ऑनलाईन प्रशिक्षण देणारे कोर्सेस मोफत उपलब्ध आहेत. सध्याचे जग इंडस्ट्री 4.0 वर चालणारे जग आहे. ऑटोमेशन हा याचा गाभा आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रोग्रामिंग स्कील विकसित करावे.  याची सुरवात विद्यार्थी ऑनलाईन प्रशिक्षणातून करू शकतात. विद्यार्थ्यांना यासाठी संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. ‘सी’ प्रोग्रामिंग विद्यार्थी शिकू शकतात. त्यासाठी वेगवेगळे ट्युटोरिअल, कोर्सेरा, ऑनलाईन कोर्सेस, स्वयंमचे ऑनलाईन कोर्सेस इत्यादी उपलब्ध आहेत. या कोर्सचे विडिओ आपण  एकदाच नाही तर समजेपर्यंत ऑनलाईन बघू शकतो. त्याचा वापर करून सामान्य व्यक्तीला उपयुक्त ठरू शकतील असे प्रोजेक्ट विद्यार्थी करू शकतात. यासाठी पण ऑनलाईन कोर्स उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ: वेगवेगळ्या प्रकारची खेळणी, ऑटोमॅटिक कार, ट्रेन आपल्या डोळ्याच्या बुबुळांच्या हालचालींवरती कंट्रोल होणारा चेंडू वगैरे.आतापर्यंत मी या लेखामध्ये विदयार्थांच्या कौशल्य गुणाबद्दल आणि त्यातल्या सुधारणांबाबत लिहिले आहे. हे करताना विद्यार्थ्यांनी पुढील गोष्टीची काळजी घेणेसुद्धा आवश्यक आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वेळेचे नियोजन, शारीरिक व्यायाम, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापराचे तांत्रिक ज्ञान. लॅपटॉप किंवा स्मार्टफोनवर काम करताना सलग एक तासापेक्षा जास्त वेळ बसू नये. दहा मिनिटाचा ब्रेक घेऊन परत काम सुरू करावे. जेव्हा दहा मिनिटांचा ब्रेक घ्याल, तेव्हा शरीर स्ट्रेच करून पाच मिनिटे चालून यावे. बसताना आपल्या उंचीप्रमाणे टेबल, खुर्ची वापरावी व एकदम ताठ बसावे. लॅपटॉप किंवा स्मार्टफोनच्या स्क्रीनपासून दोन फूट अंतर ठेवावे ज्यामुळे तुमच्या डोळ्यांना अपाय होणार नाही.

सध्याच्या  काळात शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आपण घरच्या घरी व्यायाम व योगा अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर पौष्टिक पदार्थ खाणे आणि आरोग्याची काळजी घेणे सुध्धा आवश्यक आहे.
 
- डॉ. चंद्रप्रभा मांजरे (जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,
हडपसर)


इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँण्ड सायन्स ला 'स्वायत्त महाविद्यालया'चा दर्जा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com