परदेशात अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती हवीय ? हे वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परदेशात अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती हवीय ? हे वाचा

परदेशात अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती हवीय ? हे वाचा

उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणारे अनेक विद्यार्थी भारतात आहेत. त्यात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्याखालोखाल वैद्यकशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थी परदेशात शिक्षणाला पसंती देतात. भारतीय विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा अमेरिका, इंग्लंड, युरोपमधल्या देशांमध्ये अधिक आहे. तिथे त्यांच्या आवडीला अनुकूल असे शिक्षण दिले जाते.

आपल्याला उच्चशिक्षण किंवा संशोधन नेमके कशात करायचे आहे हे मात्र स्पष्ट असावे. त्यासाठी तुम्ही जे शिकणार आहात तो विषय कोणत्या देशात अतिशय उत्तम शिकवला जातो हे नीट समजून घेणे गरजेचे आहे. त्या विद्यापीठाचे तुमच्या सबंधित विषयात जागतिक क्रमवारीत स्थान काय आहे ते समजून घेत विद्यापीठाची, देशाची निवड करावी. एकदा निवड ठरल्यावर मग त्या त्या देशांच्या परीक्षा दिल्या पाहिजेत. कारण प्रत्येक देशांची परीक्षा ही वेगवेगळी आहे. ते प्रत्येक देशानुसार व अभ्यासक्रमानुसार ठरते. परीक्षेत पास होऊन परदेशात शिकायला गेल्यावर शिक्षणाचा खर्च हा मोठा प्रश्न असतो. अनेक देशात शिष्यवृत्तीचे वेगळे पर्याय आहेत. काहीजण 'कमवा आणि शिका हा पर्याय अवलंबतात. तरी प्रत्येकाचे नियम हे वेगवेगळे असतात. भारतात मात्र परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती हवी असल्यास काही संस्था काम करतात. परदेशात उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती हवी असेल तर Sakal India Foundation च्या साईटला भेट द्या.

हेही वाचा: वैद्यकीय उपचार आणि खर्चासाठी निधी कसा उभारायचा? वाचा ही बातमी

भारतातल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देत वर्तणूक, सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणण्याचे संस्थेचे उद्दीष्ट आहे. जिथे मुलांना शिक्षणाच्या समान संधी मिळतील. 21 व्या शतकात शिक्षणासाठी आवश्यक असलेली कौशल्ये शिकतील. तसेच प्रत्येक मुलाला SIF च्या वार्षिक शिष्यवृत्ती कार्यक्रमाद्वारे उत्तम दर्जाचे शिक्षण मिळेल. कौशल्य विकास करण्यासाठी तरूणांना प्रोत्साहन देणे हे उद्दीष्ट असून त्यांना जगण्यासाठी चांगली नोकरी मिळू शकेल. मूल्ये आणि मानसिकता मजबूत करून त्यांच्या शैक्षणिक आणि चारित्र्य विकासाचा समतोल राखणे म्हणजे उत्कृष्ट शिक्षण होय.

हे आहे उद्दिष्ट

सर्व मुले शाळेत जावीत, चांगली शिकावीत याची खात्री करण्यासाठी संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते. SIF वंचित घटकांचे शिक्षण सुधारण्यासाठी आणि त्यांना उपजीविकेसाठी सक्षम बनवण्यासाठी कार्य करते. परदेशात उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती हवी असेल तर Sakal India Foundation च्या साईटला भेट द्या.

loading image
go to top