Interview Preparation : एकाच वेळी दोन कंपन्यांमध्ये मुलाखतीला बोलावलंय? अशी करा तयारी

Interview Preparation : करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी आजकाल अनेक जण नोकरी बदलतात. नोकरी बदलणे हा खर तर खूप मोठा निर्णय आहे. नवीन नोकरी शोधण्यापूर्वी तुम्ही फ्रेशर असाल किंवा अनुभवी असाल तरी देखील मुलाखतीची चांगली तयारी करावी लागते.
Interview Preparation
Interview Preparationesakal

how to crack interview

करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी आजकाल अनेक जण नोकरी बदलतात. नोकरी बदलणे हा खर तर खूप मोठा निर्णय आहे. आधीच्या नोकरीमध्ये राजीनामा देऊन अनेक जण दुसऱ्या ठिकाणी नोकरीसाठी अप्लाय करतात. नवीन नोकरी शोधण्यापूर्वी तुम्ही फ्रेशर असाल किंवा अनुभवी असाल तरी देखील मुलाखतीची चांगली तयारी करावी लागते.

मात्र, तुम्ही एकाच वेळी कधी अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या आहेत का?  जर तुम्ही एकाच वेळी अनेक कंपन्यांमध्ये मुलाखती दिल्या असतील, तर असे करणे, ही खर तर अनोखी कला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया फार मोठी आव्हानात्मक आहे. विविध कंपन्यांसाठी तुम्ही मुलाखतीची तयारी कशी करता? त्यासाठी तुम्ही तयारी कशी करता? हे देखील फार महत्वाचे आहे.

यासोबतच विविध पॅनेलच्या मुलाखती, मूल्यांकन आणि विविध कंपन्यांच्या ऑफर लेटर्सच्या वाटाघाटींमध्ये शेड्यूलिंगचा संघर्ष कसा टाळायचा? आणि या सगळ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात या खास टिप्स.

Interview Preparation
Job Skills : 2024 मध्ये नोकरी शोधताय? ‘ही’ पाच कौशल्ये तुमच्याकडे असणं आवश्यक

योग्य नियोजन करा

तुम्ही ज्या कंपन्यांमध्ये मुलाखत देणार आहात. त्या मुलाखतींचे एक वेळापत्रक तयार करा. जेणेकरून त्या मुलाखतींच्या वेळा एकमेकांमध्ये क्रॅश होणार नाहीत आणि तुमचा ही गोंधळ टळू शकेल.

मुलाखतीसाठी तयारी महत्वाची

सर्वात आधी तुम्ही ज्या कंपन्यांमध्ये मुलाखत देणार आहात, त्या कंपन्यांबद्दलची माहिती गोळा करून ठेवा. शिवाय, त्या कंपन्यांना कशा प्रकारचे उमेदवार हवे आहेत? त्यांची मुलाखतीची प्रक्रिया कशी आहे? याबद्दल माहिती घेऊन योग्य प्रकारे तयारी करा.

यासोबतच प्रत्येक कंपनीचा मुलाखतीचा फॉरमॅट कसा आहे? याकडे कटाक्षाने लक्ष द्या आणि त्याप्रमाणे तुम्हाला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची आणि उदाहरणांची तयारी करून ठेवा.

प्रामाणिक रहा

समजा तुम्हाला एखाद्या कंपनीचे ऑफर लेटर मिळाले असेल, आणि तुमची दुसऱ्या कंपनीमध्ये मुलाखत असेल, तर त्या कंपनीशी प्रामाणिक रहा. तुम्हाला आधीच एका कंपनीचे ऑफर लेटर मिळाले आहे, हे खरे सांगायला विसरू नका. खोटे सांगून तुम्ही या दोन्ही कंपन्यांशी खेळू नका. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मुलाखत देताना उत्साही आणि प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा.

सक्रिय व्हा

तुम्ही ज्या कंपन्यांमध्ये मुलाखती दिल्या आहेत. मात्र, तुमची त्या ठिकाणी निवड होऊ शकली नाही किंवा झाली ही असेल, तर अशा कंपन्यांकडून तुमच्या मुलाखतीचा फॉलो-अप किंवा फिडबॅक घ्यायला विसरू नका.

या फिडबॅकमुळे तुम्हाला स्वत:मध्ये कोणत्या कमतरता आहेत किंवा तुम्ही कुठे चुकलात? याची जाणीव होईल आणि त्याप्रमाणे तुम्ही पुढील मुलाखतीची चांगल्या प्रकारे तयारी करू शकाल.

प्रॅक्टिकल व्हा

अनेक कंपन्यांमध्ये मुलाखत झाल्यानंतर तुम्हाला ऑफर लेटर्स ही मिळाले असतील. अशा परिस्थितीमध्ये स्प्रेडशीटचा वापर करून या ऑफरलेटर्सची तुलना करा. ही तुलना करताना त्या कंपनीचे कल्चर, तुम्हाला मिळणारे पॅकेज याचे योग्य प्रकारे मूल्यांकन करा. या सगळ्यांसोबत तुमच्या कामाचा आणि आयुष्याचा योग्य प्रकारे ताळमेळ (Life Balance) ठेवण्याचा प्रयत्न करा.

या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या, तर तुमच्यातील आत्मविश्वास मजबूत राहण्यास मदत होईल. यासोबतच विविध कंपन्यांमध्ये मुलाखत देताना किंवा त्यांची तयारी करताना तुमचा गोंधळ होणार नाही. या टिप्सच्या मदतीने तुमची मुलाखतीची संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यास मदत होईल.

Interview Preparation
Career Tips : जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com