
Manoj Jarange Patil Mumbai Protest : मुंबईत मराठा आरक्षणासंबंधित आंदोलन सुरू होते. आता शासनाकडून या मागण्या मान्य होणार असल्याचे चित्र दिसत असल्याने मनोज जरांगे पाटील आंदोलन मागे घेत मुंबई सोडणार आहेत. राज्य मंत्रीमंडळाच्या उपसमितीने हैदराबाद गॅझेटला मान्यता दिली असून लवकरच राज्यपालांच्या सहीनंतर शासन निर्णय (GR) काढण्यात येणार आहे. या संदर्भात उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले आणि माणिकराव कोकाटे हे शिष्टमंडळ घेऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यांनी नवीन मसुदा मनोज जरांगेंना दाखवला आणि शासनाच्या निर्णयाविषयी सविस्तर माहिती दिली.