
CUET 2022 : अशी करा विद्यापीठ प्रवेश परीक्षेची तयारी
मुंबई : कोणत्याही प्रवेश परीक्षेची तयारी आणि नियोजन करणे सोपे नाही. प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी कठोर परिश्रम तसेच दृढनिश्चय आणि सातत्य आवश्यक आहे. यासोबतच उत्तम मार्गदर्शन आणि संसाधनांचीही गरज आहे. या लेखाद्वारे CUET 2022 च्या तयारीची रणनीती जाणून घेऊ या.
हेही वाचा: NDAच्या परीक्षेची तयारी करताय ? या गोष्टी लक्षात ठेवा...
१- परीक्षा आणि त्याचा अभ्यासक्रम समजून घेणे
तयारीची पहिली पायरी म्हणजे प्रवेश परीक्षा आणि त्याचा अभ्यासक्रम समजून घेणे. सर्वप्रथम CUET ची परीक्षा काय आहे आणि त्याचा अभ्यासक्रम कसा आहे हे जाणून घ्या. कोणत्या विषयातून प्रश्न विचारले जातील आणि कोणते विषय अधिक महत्त्वाचे आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने तुम्ही महत्त्वाचे विषय ओळखू शकाल आणि तुमचा वेळ वाचू शकेल.
२- वेळापत्रक तयार करा
जेव्हा अभ्यासक्रमाची माहिती असेल तेव्हा तयारीसाठी वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. बोर्डाची परीक्षा संपल्यानंतर CUET परीक्षा घेतली जाईल त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर वेळापत्रक बनवून तयारी सुरू करावी. एक योजना तयार करा ज्यामध्ये तुम्ही दररोज ९०-१२० मिनिटे घालवू शकता. तुमचा वेग आणि तुमच्या वेळापत्रकाला चिकटून राहा आणि तुम्ही नक्कीच परीक्षेत यशस्वी व्हाल.
३.- अधिकाधिक सराव करा
सराव ही यशाची गुरुकिल्ली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांचा सराव करणे खूप महत्त्वाचे आहे. विविध स्पर्धात्मक आणि प्रवेश परीक्षांच्या मागील प्रश्नांचा सराव करा. स्क्रीनवर MCQ चा सराव करण्यासाठी शक्य तितक्या लाइव्ह क्लासेसमध्ये सामील व्हा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक चांगले पुस्तक तुमच्या तयारीचा एक भाग बनवा.
४.- प्रेरित रहा
कोणत्याही समस्येत अगदी प्रवेश परीक्षेत यश मिळवण्यासाठी प्रेरणा खूप महत्त्वाची असते. सकारात्मक व्हा आणि यश तुमच्या स्वप्नांना आणि तुमच्या करिअरला आकार देण्यास कशी मदत करेल याचा विचार करा. आवश्यक असल्यास तज्ज्ञांशी संपर्क साधा.
Web Title: How To Prepare For Cuet
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..