NDAच्या परीक्षेची तयारी करताय ? या गोष्टी लक्षात ठेवा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NDA

NDAच्या परीक्षेची तयारी करताय ? या गोष्टी लक्षात ठेवा...

मुंबई : UPSC भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (UPSC NDA परीक्षा 2022) परीक्षा घेणार आहे. परीक्षेत गणित आणि सामान्य क्षमता चाचणी (GAT) या दोन विभागांमधून प्रश्न विचारले जातील. GAT मध्ये १५० प्रश्न आहेत, ज्यामध्ये इंग्रजीसाठी ५० प्रश्न आणि सामान्य विज्ञान, भूगोल, इतिहास आणि राजकारणाशी संबंधित सामान्य ज्ञानासाठी १०० प्रश्नांचा समावेश आहे.

हेही वाचा: एअर होस्टेस बनण्यासाठी आवश्यक आहेत या गोष्टी

परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगची तरतूद आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात पण ज्यांची तयारी चांगली आहे त्यांना संधी दिली जाते. कोणत्या टिप्सच्या मदतीने विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण करू शकतात हे जाणून घेऊ या.

१. ११वी आणि १२वी गणिताचा उत्तम सराव

दरवर्षी NDA मधील ३० ते ४० टक्के प्रश्न NCERT अभ्यासक्रमावर आधारित असतात, त्यामुळे चांगल्या तयारीमुळे परीक्षार्थींना चांगले गुण मिळू शकतात. ११वी आणि १वीची गणिते नीट वाचा आणि अभ्यास केल्यानंतर त्यांची उजळणी करा. असे केल्याने तुम्ही तुमच्या कमकुवतपणावरही काम करू शकाल.

२. मॉक टेस्ट आणि मागील वर्षाच्या पेपर्ससह तयारी करा

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि मॉक टेस्टद्वारे तयारी करून परीक्षार्थी चांगले गुण मिळवू शकतात. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांच्या मदतीने केवळ तयारी चांगली होत नाही तर उमेदवाराला परीक्षेची माहितीही मिळते. यासोबतच मॉक टेस्ट देऊन परीक्षा हॉलनुसार तयारी करता येते. मॉक टेस्ट आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला तुमच्या कमतरता जाणून घेण्यास मदत करतात.

३. गणित आणि GAT साठी संदर्भ पुस्तके वापरा

तुमची NCERT तयारी पूर्ण झाल्यावर, उजळणीसाठी संदर्भ पुस्तके वापरा. या पुस्तकांच्या मदतीने तुम्ही कमी वेळात चांगली उजळणी करू शकाल. लहान गणिताच्या युक्त्यांमध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी दररोज काहीतरी नवीन वाचा.

४. हायड्रेटेड रहा

परीक्षेची तयारी करताना आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तणाव सोडा आणि आरोग्याची काळजी घ्या. योग्य प्रकारे खा आणि स्वतःला हायड्रेटेड ठेवा आणि तयारीवर लक्ष केंद्रित करा.

६. वेळेच्या व्यवस्थापनाची काळजी घ्या

परीक्षेची तयारी करणे एक गोष्ट आहे आणि परीक्षेतील सर्व प्रश्नांचा प्रयत्न करणे दुसरी गोष्ट आहे. कितीही तयारी केली तरी सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिता येत नसतील तर सगळी मेहनत व्यर्थ जाते. अशा परिस्थितीत वेळेच्या व्यवस्थापनाची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे आणि वेळेच्या व्यवस्थापनासाठी जास्तीत जास्त सराव करणे आवश्यक आहे.

Web Title: Preparing For The Nda Exam Remember These Things

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top