esakal | बारावीचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात?
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra result 2021

बारावीचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात?

sakal_logo
By
शरयू काकडे

पुणे : सर्वोच्च न्यायलयाने 31 जुलैपर्यंत बारावीचा निकाल लावण्याचे आदेश दिल्यामुळे विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, पुन्हा एकदा बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये होणारी 12वी आणि 10वीच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल लावणार असल्याचे सांगितले होते. विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यांकन सरकारने दिलेल्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे लावणार आहे. ज्यामध्ये 10वी, 11वी आणि 12वी तील अंतर्गत मूल्यांकन गुणांचा विचार केला जाणार आहे. दहावी आणि अकरावीच्या मूल्यांकनासाठी प्रत्येकी 30 टक्के आणि 12 वीच्या मूल्यांकनासाठी 40 टक्के सूत्रानुसार निकाल लावणार आहे.

हेही वाचा: झेडपी शाळांतील विद्यार्थ्यांना घरबसल्या देता येणार परीक्षा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बारावीचा निकाल राज्य सरकारला ३१ जुलैपर्यंत जाहीर करावा लागणार आहे. त्यामुळे राज्य मंडळाने बारावीच्या निकालासाठीचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण भरण्यासाठी महाविद्यालयांना शुक्रवारपर्यंतची (ता.२३) मुदत दिली होती, त्यानंतर, एक दिवसाची मुदतवाढही देण्यात आली होती.त्यानंतर 29 ते 31 जुलै या कालावधीत बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात होती.

दरम्यान, ''पुन्हा एकदा बारावीचा लांबणीवर पडणार आहे कारण राज्यात काही भागात पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे शिक्षण विभागाने निकालासाठी जाहीर केलेली मुल्यांकन आणि गुनदानाची प्रक्रिया महाविद्यालये आणि शिक्षकांकडून अद्याप पूर्ण करु शकले नाहीत. दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल लागेल,'' अशी माहिती राज्याच्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर हिंदुस्थान टाईम्स या वृत्तसंस्थेला दिली आहे.

loading image
go to top