esakal | झेडपी शाळांतील विद्यार्थ्यांना घरबसल्या देता येणार परीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

Pune ZP

झेडपी शाळांतील विद्यार्थ्यांना घरबसल्या देता येणार परीक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - ग्रामीण भागातील (Rural Area) विद्यार्थ्यांना (Student) अत्याधुनिक पद्धतीच्या ऑनलाइन शिक्षणाची (Online Education) सोय व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेने (ZP) इन्फोसिस कंपनीच्या (Infosysy Company) सहकार्याने नवे ई-लर्निंग ॲप (E-Learning App) विकसित (Develop) केले आहे. या ॲपचे काम अंतिम टप्प्यात आले असून, येत्या आठवडाभरात ते कार्यान्वित केले जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांबाबतच्या संशोधनांचा अभ्यास करून, स्वतः या ॲपची मांडणी (डिझाईन) केली आहे. (Students in ZP Schools can Take the Exam at Home)

या ॲपमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारने वर्गनिहाय उपलब्ध करून दिलेला आणि जिल्हा परिषदेने तयार केलेला अभ्यासक्रम ऑनलाइन उपलब्ध होऊ शकणार आहे. शिवाय या ॲपच्या माध्यमातून पाठ आणि वर्गनिहाय प्रश्‍नपेढी (उत्तरासह) उपलब्ध होणार आहे. इन्फोसिसचा हा पहिला पथदर्शी प्रकल्प असणार आहे. यामुळे ग्रामीण विद्यार्थी घरबसल्या ऑनलाइन वार्षिक परीक्षासुद्धा देऊ शकणार आहेत. शिवाय जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील शिक्षक आणि विद्यार्थी हे अन्य तालुक्यातील शाळांचे परीक्षा पेपरची तपासणी करू शकणार आहेत.

हेही वाचा: पुणे : कोव्हीशील्डचे १८६ केंद्रावर उद्या (गुरुवारी) मिळणार ६२ हजार डोस

इन्फोसिस कंपनी, पुणे जिल्हा परिषद आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) यांनी एकत्रित येत, हे ॲप विकसित केले आहे. यानुसार ॲपच्या निर्मितीच्या खर्चाची जबाबदारी इन्फोसिस कंपनीने घेतली आहे. ही कंपनी जिल्हा परिषदेला मोफत हे ॲप उपलब्ध करून देणार आहे. ॲपसाठी आवश्‍यक असलेली अभ्यासक्रमांची माहिती, विषय व वर्गनिहाय प्रश्‍नपेढी उत्तरांसह जिल्हा परिषदेने उपलब्ध करून दिली आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत अभ्यासक्रम, त्यातील बदल आणि गुणवत्ता आदींबाबतचे काम केले जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी हे ॲप कार्यान्वित केले जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. यामुळे शाळांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकणार आहे.

हेही वाचा: खडकवासला प्रकल्पात बुधवार अखेर ८४ टक्के पाणीसाठा

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी विकसित करण्यात आलेले नवे ई-लर्निंग ॲप हा इन्फोसिसचा देशातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प आहे. इन्फोसिस पुणे जिल्हा परिषदेला हे ॲप मोफत उपलब्ध करून देणार आहे. यामुळे शाळांची आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यास फायदा होईल.

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

loading image
go to top