IAF Group C Recruitment | भारतीय वायुसेनेत 'ग्रुप सी'च्या अनेक पदांसाठी भरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Job_IAF

भारतीय वायुसेनेत 'ग्रुप सी'च्या अनेक पदांसाठी भरती, वाचा डिटेल्स

IAF Group C Recruitment 2021 : भारतीय हवाई दलाने 'गट C' नागरी पदांसाठी भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. IAF Group C Recruitment 2021 अंतर्गत, LDC, MTS, कुक, फायरमन आणि ड्रायव्हरसह अनेक पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाईल.

निवडलेल्या उमेदवारांना आग्रा, उत्तर प्रदेश येथे नियुक्त केले जाणार आहे. या संदर्भात हवाई ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात (30 ऑक्टोबर ते 05 नोव्हेंबर 2021) भर्ती 2021 ची जाहिरात देण्यात आली आहे. तरी उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण भरती जाहिरात वाचावी. भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत अर्ज करणे अपेक्षित आहे.

हवाई दलातील गट C नागरी पदांसाठी उमेदवारांची भरती सेंट्रल एअर कमांड हेडक्वार्टर, ईस्टर्न एअर कमांड हेडक्वार्टर, साउथईस्ट एअर कमांड हेडक्वार्टर, ट्रेनिंग कमांड हेडक्वार्टर, मेंटेनन्स हेडक्वार्टर आणि वेस्टर्न एअर कमांड हेडक्वार्टर्स येथे केली जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021

IAF गट C भर्ती 2021 उपलब्ध जागा

मुख्यालय सेंट्रल एअर कमांड

LDC - 1

MTS - 3

मुख्यालय इस्टर्न एअर कमांड

CMTD (OG) - 2

अधीक्षक (स्टोअर) - 01

LDC - 2

मुख्यालय दक्षिण पश्चिम कमांड

कुक - 1

मुख्यालय प्रशिक्षण कमांड

CMTD (OG) - 13

वेस्टर्न एअर कमांडचे मुख्यालय.

MTS - 1

कुक - 1

LDC - 2

CMTD (OG) - 5

सुतार (SK) - 1

loading image
go to top