IAS Shweta Bharti Success Story : ९ ते ५ नोकरी करताना यूपीएससीची परीक्षा पास होणं शक्य नाही, असं म्हणणाऱ्यांसाठी श्वेता भारती यांची यशोगाथा म्हणजे चोख प्रत्युत्तर आहे. त्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं आहे. श्वेता भारती मुळच्या बिहारच्या असून त्यांनी २०२१ साली यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्या बिहार कॅडरच्या आयएएस अधिकारी आहेत.