पुणे - कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयएससीई) यांच्यातर्फे घेतलेल्या आयसीएसईच्या (दहावी) परीक्षेत ९९.०९ टक्के, तर आयएससीच्या (बारावी) परीक्षेत ९९.०२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत..सीआयएससीईच्या भारतासह परदेशातील दोन हजार ८०३ शाळांमधील दोन लाख ५२ हजार ५५७ विद्यार्थ्यांनी यंदा आयसीएसईची परीक्षा दिली. त्यातील दोन लाख ५० हजार २४९ म्हणजेच ९९.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर एकूण एक हजार ४६० शाळांमधील ९९ हजार ५५१ विद्यार्थ्यांनी आयएससी परीक्षा दिली, त्यातील ९८ हजार ५७८ म्हणजेच ९९.०२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत..आयसीएसईची परीक्षा ६७ विषयांमध्ये आणि त्यातील २० प्रादेशिक भाषांचे विषय असून १४ परदेशी भाषांचे आणि एक क्लासिकल भाषेचा विषय होता. या परीक्षेत विद्यार्थिंनीच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.३७ असून, विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९८.८४ इतकी आहे.तर आयएससी परीक्षा एकूण ४७ विषयात झाली, त्यात एकूण १२ विषय भारतीय भाषांचे होते, तर त्यात चार विषय परदेशी भाषा आणि दोन क्लासिकल भाषांचे विषय होते. या परीक्षेतही उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींची टक्केवारी ९९.४५ टक्के, तर विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९८.६४ इतकी आहे..निकालाची आकडेवारी -तपशील : विद्यार्थी : विद्यार्थिनी : एकूण विद्यार्थी संख्या : उत्तीर्णतेची एकूण टक्केवारीआयसीएसई (दहावी) : १,३४,७०० : १,१७,८५७ : २,५२,५५७ : ९९.०९ टक्केआयएससी (बारावी) : ५२,३३९ : ४७,२१२ : ९९,५५१ : ९९.०२ टक्केमहाराष्ट्रातील निकाल -परीक्षा : शाळांची संख्या : परीक्षा दिलेले विद्यार्थी : विद्यार्थी : विद्यार्थिनी : उत्तीर्णतेची टक्केवारीआयसीएसई : २७० : २९,२८२ : १५,७२१ : १३,५६१ : ९९.९० टक्केआयएससी : ७७ : ३,७२३ : १,७१८ : २,००५ : ९९.८१ टक्के.शहरातील नामांकित शाळांचा निकाल -- कॅम्प येथील द बिशप स्कूलमधील विरेन लुनिया (९८ टक्के), देव कुंभार (९७.४० टक्के), यश गाडगीळ (९७.२० टक्के) आणि अयान भंडारी (९७.२० टक्के) हे विद्यार्थी आयसीएसई परीक्षेत अव्वल गुण मिळवून यशस्वी झाले आहेत. तर, आयएससी परीक्षेत पवित्रा कुमार, ओजस देशपांडे, विदीती भंडारी, अद्विता चौरे (९८.५० टक्के) यांनी अग्रस्थान पटकाविले आहे.- वाकड येथील विस्डम वर्ल्ड स्कूलमधील विराज देसाई (९९.२ टक्के), भाव्या सिंह (९९ टक्के), नविका अंजना, मेधांश देशमुख (९८.८ टक्के) गुण मिळवून आयसीएसई परीक्षेत अव्वल आले आहेत. या परीक्षेत शाळेतील ११२ विद्यार्थ्यांना ९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत, तर तब्बल १४३ विद्यार्थ्यांना ८० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत..- विद्या प्रतिष्ठान मगरपट्टा सिटी पब्लिक स्कूलमधील १०० टक्के विद्यार्थी आयसीएसई परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतील मनस्वी देशपांडे (९८.८ टक्के), आदित्य गुप्ता, साहिल गुप्ता, यश जगदाळे, शर्वी शिंपी (९८.६ टक्के), भार्गव कविटके (९८.४ टक्के) अव्वल आले आहेत.- कलाइन मेमोरिअल स्कूलमधील १०० टक्के विद्यार्थी आयसीएसई परीक्षेत उत्तीर्ण झाले असून शरण्य चव्हाण, ऋचा देरे, शंतनू वाल्हेकर (९६.२ टक्के) यांनी अग्रस्थान पटकाविले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.