Kanpur Ai Online Course: घरबसल्या करा IIT चा AI-ML कोर्स; गुगल, मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरीचे स्वप्न पूर्ण होणार

IIT Kanpur: IIT कानपूरचा ऑनलाइन PYTHON प्रमाणपत्र कोर्स; AI, ML, DL कौशल्यांसह प्रत्यक्ष प्रोजेक्ट्स, Google-Microsoft तज्ज्ञांची मार्गदर्शक व्याख्याने
iit kanpur ai online course

iit kanpur ai online course

sakal

Updated on

कृत्रिम बुद्धिमत्ता,: मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग क्षेत्रातील कौशल्ये आत्मसात करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसह प्राध्यापक आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी आयआयटी कानपूरने विशेष ऑनलाइन प्रमाणपत्र कार्यक्रम जाहीर केला आहे. ‘IIT Kanpur Certificate Program on PYTHON for Artificial Intelligence, Machine Learning and Deep Learning’ हा कार्यक्रम १४ डिसेंबर २०२६ ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात Pythonच्या माध्यमातून AI, मशीन लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स आणि डीप लर्निंगच्या विविध संकल्पना शिकवल्या जाणार आहेत. केवळ सैद्धांतिक अभ्यासाऐवजी प्रत्यक्ष डेटासेटवर काम करून प्रोजेक्ट्स तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com