Jobs : आयआयटी मद्रासमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांची होतेय भरती ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher
आयआयटी मद्रासमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांची होतेय भरती !

आयआयटी मद्रासमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांची होतेय भरती !

सोलापूर : अध्यापन क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. IIT Madras (Indian Institute of Technology, IIT Madras) ने सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज (Recruitment) मागवले आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, मद्रास यांनी 49 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले सर्व उमेदवार आयआयटी मद्रासच्या अधिकृत साइट iitm.ac.in वर ऑनलाइन अधिसूचना पाहू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 डिसेंबर 2021 आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

हेही वाचा: इंडस्ट्रिअल कार्बनपासून इको-फ्रेंडली टाइल्सची निर्मिती!

संस्थेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, केवळ SC / ST / OBC-NCL / EWS श्रेणीतील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार पीएचडीधारक असावेत. यासोबतच संबंधित विषयात चांगला शैक्षणिक रेकॉर्ड असावा.

वयोमर्यादा

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षांपेक्षा कमी असावे. उमेदवारांनी अर्जासोबत भारत सरकारच्या विहित नमुन्यात त्यांचे वैध SC / ST / OBC-NCL / EWS आणि PWD प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्‍यक आहे.

असा करा अर्ज

उमेदवार आयआयटी मद्रासच्या अधिकृत वेबसाइट iitm.ac.in वरून अर्ज डाउनलोड करू शकतात आणि इतर आवश्‍यक कागदपत्रांसह भरलेला अर्ज अपलोड करू शकतात.

हेही वाचा: डिसेंबर-जानेवारीत महाविद्यालयांची ऑफलाईन परीक्षा !

अशी होईल निवड प्रक्रिया

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या शॉर्टलिस्टेड उमेदवारांना वैयक्तिक मुलाखत फेरीसाठी बोलावले जाईल, ज्यामध्ये वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावलेल्या बाह्य उमेदवारांना 2 टियर एसी रेल्वे भाडे किंवा इकॉनॉमी क्‍लासचे विमान भाडे परतफेड केले जाईल. अर्जदारांना या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

Web Title: Iit Madras Is Recruiting For The Post Of Assistant Professor

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :viraleducationjobsupdate
go to top