महत्त्व संभाषण कौशल्याचे 

शीतलकुमार रवंदळे 
Thursday, 16 April 2020

संभाषण कौशल्य उत्तम असलेले विद्यार्थी ग्रुपमध्ये चमकतात.   व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यातही चांगल्या संवाद कौशल्याचा फायदा होतो.

प्लेसमेंटसाठी महत्त्वाचे कौशल्य म्हणजे संभाषण वा संवाद कौशल्य. संवाद कौशल्याचे महत्त्व व ते उत्तमरीत्या आत्मसात कसे करता येईल, ते बघूया. कंपनीत भरती करताना ग्रुप डिस्कशन व वैयक्तिक मुलाखत वा एचआर मुलाखत हे दोन महत्त्वाचे दोन आहेत. या दोन्ही टप्यांत विद्यार्थ्याचे संभाषण कौशल्य कसे आहे, हे प्रामुख्याने पाहिले जाते. काही विद्यार्थ्यांचे मार्क्स, ॲप्टिट्युड व तांत्रिक ज्ञान अतिशय चांगले असूनही, संवाद कौशल्य कमी असल्यास मुलाखतीदरम्यान आत्मविश्‍वास कमी आढळतो. त्यामुळे भरतीदरम्यान त्यांना अडचणी येतात. संभाषण कौशल्य उत्तम असलेले विद्यार्थी ग्रुपमध्ये चमकतात. व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यातही चांगल्या संवाद कौशल्याचा फायदा होतो. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाविद्यालये, शिक्षक व ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर्स यांनीही विद्यार्थ्याचे संवाद कौशल्य वाढविण्यावर अभ्यासासारखाच भर दिला पाहिजे. स्पर्धात्मक काळात अभ्यासक्रमाबरोबरच उत्तम संवाद कौशल्य गरजेचे आहे. ती ओळखून अनेक विद्यापीठात संवाद कौशल्ये ही अभ्यासक्रमात समाविष्ट केली आहेत. विद्यार्थ्याचे अकरावी व बारावीचे शिक्षण इंग्रजीतून झाले असेल, तसेच पदवीचे शिक्षणही इंग्रजीतून सुरू असल्यास इंग्रजी समजणे, वाचणे वा लिहिणे अडचणीचे नसते. 

EDU नोकरी करिअर विषयी लेख वाचण्यासाठी येथे   ► क्लिक करा 

१) प्रथम वर्षापासूनच इंग्रजी संवाद कौशल्ये वाढविण्यासाठी महाविद्यालयांनी काही तास द्यायला हवेत. महाविद्यालयात शिक्षकांशी किंवा मित्रांबरोबर संवाद साधताना विद्यार्थी व शिक्षक सर्वांनीच इंग्रजीतून संवाद साधल्यास विद्यार्थ्यांची इंग्रजी कौशल्ये उत्तम प्रतीची होऊ शकतात. 

२) विद्यार्थ्यांनी उत्तम दर्जाची संवाद कौशल्य कमी वेळात आत्मसात करण्यासाठी विशेषतः दैनंदिन जीवनात इंग्रजी भाषेतून नियमित बोलण्याचा सराव करावा. 

३) ॲप्टिट्युडप्रमाणेच संवाद कौशल्य वाढविण्याचा उपाय म्हणजे इंग्रजी बोलण्याचा सराव. वसतिगृहात व महाविद्यालयीन वेळेनंतर उरलेल्या वेळात ४ ते ५ विद्यार्थ्यांचा चांगला ग्रुप बनवावा. त्यात विद्यार्थ्यांनी रोज साधारण एक तास इंग्रजीतूनच कुठल्याही विषयावर संवाद साधण्याचा सराव केल्यास उत्तम संवाद कौशल्य आत्मसात होतात. 

४) कंपनीच्या प्लेसमेंटला जाण्यापूर्वी महाविद्यालयांनी प्रत्येक विद्यार्थ्याचे साधारण २ ते ३ ग्रुप डिस्कशन व २ ते ३ मुलाखती घेतल्यास प्लेसमेंटचे प्रमाण बऱ्यापैकी वाढू शकते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Importance of communication skills article