

career values,
esakal
विनायक द्रविड :- करिअर मार्गदर्शक व ट्रेनर
अनेक वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आहे, मी तेव्हा वयाने बराच लहान होतो, माझे वडील मला घेऊन खरेदीला गेले. आम्ही खरेदी केली व वडिलांनी दुकानदाराला पैसे दिले. दुकानदाराने चुकून वडिलांना जास्त पैसे परत केले. वडिलांनी जास्त आलेले पैसे लगेच दुकानदाराला परत केले आणि त्याला सांगितलं, तुम्ही जास्त पैसे दिले चुकून. दुकानदाराने वडिलांना धन्यवाद दिले आणि आम्ही तिथून घरी निघून आलो. माझ्या आयुष्यात प्रामाणिकपणाचा हा पहिला धडा तोच होता आणि तो कायमचा मनावर कोरला गेला. प्रामाणिकपणामुळे तुमची विश्वासार्हता ठरविली जाते. तुमच्या व्यक्तिमत्त्वात हा गुण असणे आवश्यक आहे. वरवर पाहता प्रामाणिकपणा हा अगदी किमान स्वरूपाचा गुण वाटतो. परंतु त्याची व्याप्ती तुमच्या आयुष्यात महत्त्वाची ठरते. प्रामाणिकपणाचे महत्त्व फक्त आर्थिक व्यवहारात असते, हा एक मोठा समज आहे. हा गुण तुमच्या रोजच्या व्यवहारात व प्रत्येक उपक्रमात लागू पडतो व त्याचे महत्त्वही तेवढेच आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वात हा गुण नसल्यास लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. आपण वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रामाणिकपणा पाहूयात...