शाळा सुरू करा! मुंबईतील 67 टक्के पालक तयार : सर्व्हे

शाळा सुरू करा! मुंबईतील 67 टक्के पालक तयार : सर्व्हे
शाळा सुरू करा! मुंबईतील 67 टक्के पालक तयार : सर्व्हे
शाळा सुरू करा! मुंबईतील 67 टक्के पालक तयार : सर्व्हेGallery
Summary

एडटेक प्रमुख कंपनी 'लीड'ने पालकांचे सर्वेक्षण करून त्यांचे मुलांना शाळेत पाठवण्यासंदर्भात मते जाणून घेतली आहेत.

सोलापूर : कोरोनामुळे (Covid-19) गेल्या वर्षी मार्चपासून राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद आहेत. याला पर्याय म्हणून राज्यातील शाळांनी (School) ऑनलाइन शिक्षणाला (Online Education) सुरवात केली. मात्र, ऑनलाइन शिक्षणातील अडथळे, गरीब पालकांकडे मोबाईल नसणे, मोबाईल असूनही रेंज नसणे व सर्वकाही असताना ऑनलाइन शिक्षण मुलांच्या पचनी न पडणे यामुळे ऑनलाइन शिक्षणाबाबत नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. मुलांना ऑनलाइनपेक्षा शाळेत ऑफलाइन शिक्षणच महत्त्वाचे आहे, याबाबत पालक सजग झाले आहेत. यामुळे तसेच राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकारने लॉकडाउन (Lockdown) शिथिल केले आहे. हे करत असताना व शाळा टप्प्या-टप्प्याने जवळपास 18 महिन्यांनंतर पुन्हा सुरू होत असताना एडटेक प्रमुख कंपनी 'लीड'ने पालकांचे सर्वेक्षण करून त्यांचे मुलांना शाळेत पाठवण्यासंदर्भात मते जाणून घेतली आहेत.

शाळा सुरू करा! मुंबईतील 67 टक्के पालक तयार : सर्व्हे
प्रतिकूल परिस्थितीत निमगावच्या शेतकरीपुत्राने मिळवले CA परीक्षेत यश

लीडच्या सर्वेक्षणात असे निदर्शनास आले की, 59 टक्के पालकांचे कोरोनामुळे त्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे मत होते, तर मुंबईतील 67 टक्के पालक त्यांच्या मुलांना शाळेत पुन्हा पाठवण्यास तयार आहेत. त्यांचा विश्‍वास आहे की, शाळा पुन्हा सुरू झाल्या तरच मुलांना योग्यरीत्या शिक्षण मिळू शकते. मेट्रो व नॉन-मेट्रो शहरांमधील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांच्या 10 हजार 500 पालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. मुलांचे आरोग्य व सुरक्षितता लक्षात घेत लीडच्या सर्वेक्षणाने निदर्शनास आणले की, 22 टक्के पालकांनी शालेय कर्मचाऱ्यांचे लसीकरण होण्याला अधिक प्राधान्य दिले. मेट्रो शहरांमधील 55 टक्के पालकांनी सोशल डिस्टन्सिंगला अधिक महत्त्व दिले आणि त्यानंतर हेल्थकेअर सुविधांना 54 टक्के प्राधान्य देण्यात आले. नॉन-मेट्रो शहरांमधील 52 टक्के पालकांनी क्रीडा व सोशल डिस्टन्सिंगला महत्त्व दिले.

लीडच्या सर्वेक्षणाने निदर्शनास आणले की, मेट्रो शहरातील 47 टक्के पालकांनी त्यांच्या मुलांच्या शाळेमध्ये दिवसातून 3 ते 4 तास घालवले, तर मेट्रो शहरांमध्ये हे प्रमाण 44 टक्के होते. तसेच सर्वेक्षणाने निदर्शनास आणले की, 63 टक्के पालकांचे मत होते, की प्रत्यक्ष क्‍लासरूममध्ये उपस्थित असल्यास मुलांमध्ये उत्तम सोशल इंटरऍक्‍शन निर्माण होतील. लीडचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुमीत मेहता म्हणाले, मागील दीड वर्ष शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सोपे राहिले नाही. अल्प उत्पन्न गटातील मुलांचे डेटा व डिवाईसेसच्या अनुपलब्धतेमुळे शैक्षणिक नुकसान झाले. आमचे सर्वेक्षण स्पष्टपणे निदर्शनास आणते की, मुंबईतील 67 टक्के पालकांचा त्यांच्या मुलांना शाळेत पुन्हा पाठवण्यासाठी होकार आहे. 33 टक्के पालक त्यांच्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नाहीत, याबाबत पालकांचे मत देखील विचारात घेतले पाहिजे. म्हणूनच ऑनलाइन शिक्षण सुरूच ठेवले पाहिजे. शाळांना आवश्‍यक युटिलिटीज म्हणून महत्त्व दिले पाहिजे आणि पालकांनी सकारात्मक व खुल्या मनासह त्यांच्या मुलांना शाळेत पाठवले पाहिजे.

नॉन-मेट्रो शहरांमधील फक्‍त 40 टक्के पालक म्हणाले, त्यांची मुले पर्सनल कम्प्युटरवर शिक्षण घेतात, तर मेट्रो शहरांमधील 60 टक्के पालकांनी सांगितले की लॉकडाउनला एक वर्ष झाले असताना देखील त्यांची मुले कम्प्युटर/ लॅपटॉपवर शिक्षण घेत आहेत. नॉन-मेट्रो शहरांमधील बहुतांश विद्यार्थ्यांनी स्मार्टफोन्सच्या माध्यमातून शालेय शिक्षण घेतले, ज्यामुळे पालकांच्या चिंतेमध्ये अधिक वाढ झाली. डेटामधून निदर्शनास येते की, मुलांचे व्हर्च्युअल एज्युकेशन वातावरण भावी कौशल्ये अवगत करण्यासंदर्भात मेट्रो शहरांतील पालकांच्या तुलनेत नॉन-मेट्रो शहरांमधील पालकांसाठी अधिक चिंताजनक राहिले आहे. मेट्रो शहरामधील 53 टक्के पालकांनी समस्या निवारण व तार्किक विचार यांना सर्वात महत्त्वपूर्ण कौशल्य मानले, तर नॉन-मेट्रो शहरांमध्ये हे प्रमाण 47 टक्के होते. त्याचप्रमाणे मेट्रो शहरांमधील 50 टक्‍क्‍यांहून अधिक पालकांना डिजिटल साक्षरता अधिक महत्त्वपूर्ण कौशल्य वाटले, तर नॉन-मेट्रो शहरांमध्ये हे प्रमाण फक्‍त 45 टक्के होते. व्यावसायिक शिक्षण व कौशल्ये, नैतिक श्रवण व कोडिंग आणि कम्प्युटेशनल स्किल्स या काही इतर कौशल्यांना मेट्रो शहरातील पालकांनी महत्त्व दिले.

शाळा सुरू करा! मुंबईतील 67 टक्के पालक तयार : सर्व्हे
एकेकाळी पायात चप्पलही नव्हते, मात्र आज करतोय कोट्यवधींची उलाढाल!

मेट्रो व नॉन-मेट्रो शहरांमधील 70 टक्के पालकांनी सांगितले की, पालकांनी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष दिले. मेट्रो शहरांमध्ये फक्‍त आईनेच मुलांचा अभ्यास घेण्याचे प्रमाण सर्वाधिक 21 टक्के होते, तर त्याच्या तुलनेत नॉन-मेट्रो शहरांमध्ये हे प्रमाण कमी म्हणजे 18 टक्के होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com