- प्रा. विजय नवले, करिअरतज्ज्ञ
भारत हा कृषिप्रधान देश आहे. मागील काही वर्षांत शेतीचे प्रमाण काही अंशी कमी झाले आणि तुलनेने अन्य सेवा क्षेत्रांचे प्रमाण वाढले. मात्र, मुळात भारतात एकूण शेतीवर आधारित लोकसंख्या आणि शेतीतील उत्पादने यांचे प्रमाण जास्त आहे. तरीही या बदलत्या कालखंडात शेती करणे सोपे नाही, असे बोलले जाते.