इंडियन आर्मीच्या Common Entrance परीक्षा स्थगित; लष्कराचा महत्वपूर्ण निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Army

इंडियन आर्मीच्या Common Entrance परीक्षा स्थगित; लष्कराचा महत्वपूर्ण निर्णय

Indian Army Common Entrance Exam : भारतीय लष्कराची सामान्य प्रवेश परीक्षा (Indian Army Common Entrance Exam) पुढे ढकलण्यात आली आहे. देशभरात कोविडच्या संक्रमणामुळे ही चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय लष्कराने घेतला आहे. 30 मे रोजी ही परीक्षा हैदराबादच्या आर्मी सेंटरमध्ये होणार होती. तसेच तेलंगणा राज्य स्पोर्ट्स स्कूल, हकीमपेट येथे आयोजित सैन्य भरती रॅली 4 मार्च ते 24 मार्च दरम्यान घेण्यात येणार होती. (Indian Army Common Entrance Examination Postponed)

डिफेन्स विंगने दिलेल्या अधिसूचनेनुसार, यासंदर्भात अधिकृत नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानुसार 30 मे रोजीची प्रस्तावित भारतीय लष्कराची सामान्य प्रवेश परीक्षा (cee) पुढे ढकलण्यात येत आहे. देशभरातील कोविड संक्रमण परिस्थितीचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नवीन परीक्षेच्या तारखांची घोषणा लवकरच केली जाईल, असेही लष्कर अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या परीक्षेबाबत अधिक माहितीसाठी उमेदवारांनी भारतीय लष्कराच्या वेबसाइटला www. joinindianarmy.nic.in भेट द्यावी.

NWDA Recruitment : राष्ट्रीय जल विकास प्राधिकरणात 62 पदांसाठी भरती, 'असा' भरा अर्ज

यापूर्वी भारतीय सैन्याने जयपूर आणि जोधपूर येथे होणारी भारतीय सैन्य भरती (Indian Army) परीक्षा पुढे ढकलली आहे. जयपूर आणि जोधपूर येथे 30 मे रोजी ही परीक्षा होणार होती. या संदर्भात, राजस्थानच्या संरक्षण पीआरओने 30 मे 2021 रोजी वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त उमेदवारांची रॅली आणि संयुक्त प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती राजस्थानच्या संरक्षण पीआरओने दिली होती.

विशेष म्हणजे, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट देशभरात वाहत असल्याने सर्व परीक्षा तहकूब करण्यात आल्या. यामध्ये सीबीएसई, यूपीसह देशातील सर्व राज्यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा तहकूब केल्या. त्याअंतर्गत सीबीएसईने दहावीची परीक्षा रद्द केली आहे. त्याचबरोबर बारावीच्या परीक्षेच्या संदर्भात माहिती जाहीर केली जाईल, असे सांगितले.

Indian Army Common Entrance Examination Postponed

Web Title: Indian Army Common Entrance Examination

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top