भारतीय लष्करात नोकरीची संधी! राज्यानुसार करा नोंदणी

भारतीय लष्करात नोकरीची संधी! राज्यानुसार करा नोंदणी

Indian Army Recruitment Rally 2021: नवी दिल्ली : भारतीय सैन्यदलामध्ये कित्येक तरुणांचे स्वप्न असते. तुम्ही जर त्यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे. भारतीय सैन्यदलाने संपूर्ण देशामध्ये भरती रॅली आयोजित केली आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानसह कित्येक राज्यांमध्ये ही भरती रॅली भारतीय सैन्याकडून आयोजित केली जात आहे. (Indian Army Recruitment Rally 2021 Check here the details of rally to be organized across India)

भारतीय सैन्य भरती रॅलीचे वेळापत्रक

  • पंजाब भरती रॅली (Punjab Recruitment Rally): भारतीय सैनदलार्फे येत्या काही दिवसांमध्ये पंजाब राज्यामध्ये फतेहगढ साहिब, बरनाला, मानसा, संगरुर, आणि पटियालामध्ये सैन्य भरती रॅली आयोजित करेल. ही रॅली एडीएसआर ग्राउंड (पटियाला, संगरूर रोड, फ्लाइंग क्लबसमोर)वर 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत आयोजित केली जाणार आहे. त्यासाठी उमेदवरांना 6 जून ते 20 जुलैपर्यत ऑनलाईन अर्ज पाठवू शकता.

  • गुजरात भरती रॅली (Gujrat Recruitment Rally) : भारतीय सैनदलार्फेद गुजरात राज्यामध्ये आनंद, वलसाड, तापी, डांग, नवसारी, साबरकांठा, वडोदरा, मेहसाणा, सूरत, बनासकांठा, नर्मदा, महीसागर, अहमदाबाद, गांधीनगर, अरावली, छोटा उदेपुर, भरूच, खेदा, दाहोद, पंचमहल आणि दमन, दादरा आणि नगर हवेली येथे भरती रॅली 5 ऑगस्ट ते 22 ऑगस्टदरम्यान कनेलव स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, गोधरा, पंचमहल (गुजरात) येथे आयोजित केली जाणार आहे. ऑफिशिअल वेबसाईटवर उमेदवार 6 जून ते 20 जुलैपर्यत ऑनलाईन अर्ज पाठवू शकतात.

  • राजस्थान भरती रॅली (Rajasthan Recruitment Rally): भारतीय सैन्यदलातर्फे राजस्थानमध्ये जोधपुर, अलवर, जयपुर, कोटा, झुंझुनू और जोधपुर येथे कित्येक पदांवर भरती होणार आहे. . त्यासाठी नोंदणीची प्रक्रिया 14 मे ते 27 जून पर्यंत सुरु असून इच्छूक उमेदवार अर्ज करु शकतात. ही भरती 11 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत होईल,

  • लडाख भरती रॅली (Laddakh Recruitment rally) : भारतीय सैन्य दला तर्फे केंद्र शासित प्रदेशातील लडाखमधील उमेदवारांसाठी भरती रॅली आयोजित केली जाणार आहे. लेह और कारगिलमध्ये 24 जून ते 30 जून या कालावधी ही भरती रॅली होणार आह. यासाठी ऑफिशिअ वेबसाईटवर जाऊन 9 जून पर्यंत अर्ज प्रक्रिया पुर्ण करु शकता.

  • उत्तरप्रदेश भरती रॅली( UP Recruitment Rally): भारतीय सेन्यदलातर्फे उत्तर प्रदेशमध्ये बहराइच, बलरामपुर, बरेली, बदायूं, फर्रूखाबाद, लखीमपुर खीरी, सीतापुरसह कित्येक जिल्ह्यांध्ये भरती रॅली आयोजित केली जाते. उत्तर प्रदेशमध्ये 7 जून ते 30 जून या कालावधीत राजपूत रेजीमेंट, फतेहगढमध्ये आयोजित केली जाणार आहे.

  • हरियाना भरती रॅली (Haryana Recruitment Rally): भारतीय सेन्य दलाच्या तर्फे अंबाला, कॅथल, कर्नाल, कुरुक्षेत्र, यमुनानगर, पंचकुला आणि चंडीगढ़ मध्ये भरती रॅली आयोजित केली जाईल. इच्छु आणि पात्र उमेजदवार 22 मे पर्यंत या भरतीसाठी नोंदणी करु शकतात. अंबालामध्ये ही भरती रॅली तेजली स्पोर्ट्स कांप्लेक्स, यमुनानगर येथे 7 जून चे 25 जून या कालावधीत आयोजित होणार आहे.

भारतीय लष्करात नोकरीची संधी! राज्यानुसार करा नोंदणी
जेट एअरवेज पुन्हा उडणार; NCLT कडून रिझॉल्यूशन प्लॅनला मंजूरी

या पदांसाठी होणार भरती

  • सोल्जर जनरल ड्यूटी

  • सोल्जर टेक्निकल

  • सोल्जर नर्सिंग असिस्टेंट

  • सोल्जर क्लर्क

  • सोल्जर ट्रेड्समॅन

भरती रॅलीसाठी कसा कराल अर्ज

उमेदवरांना joinindianarmy.gov.in या ऑफिशल वेबसाईटला भेट देऊन स्थाननिहाय होणाऱ्या भरती रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करवी लागेल. उमेदवारांनी दिलेल्या तारीख आणि वेळनुसार भरती रॅलीला उपस्थित राहावे लागेल.

भारतीय लष्करात नोकरीची संधी! राज्यानुसार करा नोंदणी
भूक लागलेला हत्ती पोहोचला थेट किचनमध्ये; VIDEO VIRAL

सैन्य भरती रॅलीसाठी पात्रता

शैक्षणिक / तांत्रिक पात्रता आणि अनुभवः

  • सोल्जर जनरल ड्यूटी : इच्छुक उमेदवारांना दहावी पास आणि किमान 33 टक्के मार्क असणे अनिवार्य आहे.

  • सोल्जर टेक्निकल : इच्छुक उमेदवारांनी 10 आणि 12 वीमध्ये(सायन्स) पास असणे अपेक्षित असून(PCME)किमान 50 टक्के मार्क्स अपेक्षित आहे.

  • सोल्जर नर्सिंग असिस्टेंट : इच्छुक उमेदवारांनी 10 आणि 12 वीमध्ये(सायन्स) किंवा(मेकॅनिकल/ इलेक्ट्रीकल/ ऑटोमोबाईल/ कॉप्यूटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक आणि इन्स्ट्रुमेंटेशन) तीन वर्षांचा डिप्लोमा किमान 50 टक्के मार्क्स अनिवार्य आहे.

  • सोल्जर क्लर्क : इच्छुक उमेदवारांनी 10 आणि 12 वीमध्ये(सायन्स) किंवा बीएससी (बॉटनी/झुलॉजी/बायोसायन्स) आणि इंग्रजी पास असणे अपेक्षित असून किमान 50 टक्के मार्क्स अनिवार्य आहे.

  • सोल्जर कर्ल्क/ एसकेटी : इच्छुक उमेदवारांनी 10 आणि 12 वीमध्ये किमान60 टक्के मार्क्स आणि इंग्रजी/मॅथेमॅटिक्स/ अकांउटिंग/ बुककिपिंगमध्ये किमान 50 टक्के मार्क्स अनिवार्य आहेत

  • सोल्जर ट्रेड्समॅन(ऑल आर्म) : इच्छुक उमेदवारांनी 10वी पास आणि संबधित शाखेतील आयटीआय पास असणे अनिवार्य आहे.

  • सोल्जर ट्रेड्समॅन : 8 वी पास

सैन्य भरती रॅलीची निवड प्रक्रिया

शारीरिक फिटनेस टेस्ट, शारीरिक मापन चाचणी, वैद्यकीय आणि लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

सैन्य भरती रॅलीबाबत सविस्तर नोटिकिशन वाचण्यासाठी क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com