
१० पास असणाऱ्यांसाठी Indian Navy मध्ये बंपर भरती! २२ मार्चपर्यंत करा अर्ज
Indian Navy Jobs 2022 : भारतीय नौदलात दहावी पास असलेल्या लोकांसाठी नोकरीची संधी आहे. ट्रेडसमन स्किल्ड ग्रुप सीसाठी जागा निघाल्या असून त्यासाठी नौदलात १५३१ जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी २२ मार्चपर्यंत अर्ज करायचा आहे. १० वी पास असलेले ट्रेड्समन स्किल्ड पदांसाठी अर्ज करू शकतात. नौदलाच्या वेबसाईटवर जाऊन यासाठी अर्ज करायचा आहे. उमेदवारांची ट्रेड्समन कुशल पदांसाठी लेखी परीक्षेच्या आधारे निवड होणार आहे.
हेही वाचा: PM Shadi Shagun Yojana: सरकारकडून मुलींना मिळतील ५१ हजार रूपये, जाणून घ्या योजना
अशी आहे पात्रता
शैक्षणिक योग्यता- मान्यताप्राप्त बोर्डाकडून १० वीची परीक्षा पास असावी. संबंधित ट्रेडमधील अप्रेंटिस केलली असवी. किंवा मेकॅनिक ट्रेडमधील अप्रेंटिस. दोन वर्षांच्या नियमित सेवेसह संबंधित तांत्रिक शाखेत लष्कर, हवाई दल आणि नौदलापैकी कोणत्याही एका प्रशिक्षणार्थीसह कोणत्याही ट्रेडमध्ये त्याच्या समकक्ष.
उमेदवाराचे वय- उमेदवाराचे वय १८ ते २५ दरम्यान असावे.
निवड- निवड प्रक्रिया करताना पहिल्यांदा अर्जछाननी होईल. त्यानंतर योग्य अर्जाचा फॉर्म शॉर्टलिस्ट केला जाईल. नंतर लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील. यामध्ये विचारले जाणारे प्रश्न १०वीच्या प्रश्नपत्रिकेशी मिळतेजुळते असतील.
हेही वाचा: नोकरी सोडलेल्या महिलांना 'ही' बँक देते पुन्हा संधी, लवकर भरा अर्ज
Web Title: Indian Navy Bharti 2022 For 1531 Tradesman Skilled Posts 10th Pass Govt Jobs Indian Navy
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..