
रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) जाहिरात क्रमांक CEN क्रमांक ०८/२०२४ अंतर्गत विविध लेव्हल १ पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. या संदर्भात एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दरम्यान या पदांसाठी अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे एकूण ३२,४३८ पदांची भरती केली जाईल.