
इंफाळ : मणिपुरातील लोकतक तलावात मच्छीमार समुदायातील मुलांसाठी आठ वर्षांपूर्वी सुरू केलेली देशातील पहिली तरंगती प्राथमिक शाळा आता अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. ही शाळा सुरू ठेवण्यासाठी समुदायाला कोणताही मार्ग सापडत नसल्याने सरकारी मदतीची मागणी केली जात आहे.