नोकरी बाजारपेठ : ‘फार्म टू फोर्क’ असा प्रवास शक्य!

‘मेक इन इंडिया’ या धोरणामुळे अनेक उद्योगांना सध्या चालना मिळत आहे. त्यात केंद्र सरकारकडून फूड इंडस्ट्री वाढविण्यासाठी विविध प्रकारच्या सबसिडी दिल्या जातात.
Food
Foodsakal

- इंद्रनील चितळे

‘मेक इन इंडिया’ या धोरणामुळे अनेक उद्योगांना सध्या चालना मिळत आहे. त्यात केंद्र सरकारकडून फूड इंडस्ट्री वाढविण्यासाठी विविध प्रकारच्या सबसिडी दिल्या जातात. अशावेळी ‘बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेज’ करता येणारे स्कील सेट असणारे लोक ही या दशकाची गरज असणार आहे. त्यातून आपले उत्पादन वाढणार आहे. ते उत्पादन जगभरात विकण्याची संधी किंवा बाजारपेठ मिळणार आहे.

याशिवाय खाद्यपदार्थांमध्ये व्हॅल्यू अॅडिशन करू शकतो. नॅनो आणि बायो टेक्नॉलॉजीमुळे ते शक्य आहे. बायो टेक्नॉलॉजीमध्ये जीवित कल्चर असलेल्या गोष्टींचा वापर शरीरातील अंतर्गत अवयवांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी करू शकतो. ज्यात प्री-बायोटिक्स, प्रो-बायोटिक्स आणि बायो टेक्नॉलॉजी एनेबल फूड यांचा समावेश होतो. नॅनो टेक्नॉलॉजी फूड सायन्सच्या दृष्टीने विकसित होत आहे.

आत्तापर्यंत नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर खगोलशास्त्रज्ञ किंवा लष्करासाठी विशिष्ट खाद्यपदार्थांपुरताच मर्यादित होता. तो आता वैयक्तिक आहारापर्यंत येऊन पोहोचला आहे. आहाराविषयी जागरूकता निर्माण झाल्यामुळे वैयक्तिक आहारात हा ट्रेंड आला आहे. मधुमेह, रक्तदाब यासारखे जीवनशैलीशी निगडित आजार बळावत आहेत.

प्रत्येकाची जीवनशैलीशी वेगळी असते, आजार वेगळे असतात, त्यामुळे प्रत्येकाचे न्यूट्रिशन आणि डाएट ही वेगवेगळे असते. त्यामुळे न्यूट्रिशन आणि डाएट यांचा अभ्यास असावा लागणार आहे. न्यूट्रिशन या क्षेत्रात ही पुढील काळात मोठी संधी आहे. त्यामुळे या विषयाचे कोर्स करणेही फायदेशीर ठरेल.

वैयक्तिक न्यूट्रिशियन ही सेवा पुरवताना बायो आणि नॅनोसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करू शकलो तर एकूणच मनुष्यजातीचे जीवनमान उंचावणे शक्य होईल. आपल्या देशातील लोकांचे सरासरी वय २७ वर्षे आहे. भारत २०४०पर्यंत तरुणांचा देश म्हणूनच ओळखला जाईल. लोकसंख्या वाढल्यानंतर आपल्या आणि बाहेरच्या देशातही चांगल्या दर्जाचे पोषणमूल्य असणारे खाद्य पुरवणे ही आपली जबाबदारी राहणार आहे.

प्रतिक्रियाशील आरोग्यसेवा आणि औषधांवर बेतलेली जीवनशैली यांच्या तुलनेत यापुढे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि न्यूट्रिशनवर आधारित जीवनशैली याचे महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे फूडचा वापर हा फोकस न्यूट्रिशनवर जाईल. त्यामुळे त्याचे शिक्षण घेणे उपयुक्त ठरणार आहे. त्याची गरज पुढची तीस वर्षे राहणार आहे. चॅट जीटीपी आणि एआयच्या काळात हे सगळे मॅप करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

या सर्वांची प्रत्यक्ष डिलिव्हर करण्याची जबाबदारी उद्योगांवरच राहणार आहे. त्यामुळे अशा उद्योगांना लागणारे कर्मचारीही वेगवेगळी कौशल्ये असणारे लागणार आहेत. या नव्या रोजगारासाठी आवश्यक असणारी कौशल्ये वाढविण्यासाठी डेटा सायन्स, इन्फॉर्मेशन सिस्टीम या सारखे छोटे, शॉर्टटर्म ऑनलाइन कोर्सेस करणे उपयुक्त ठरणार आहे.

अशा मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमवर अभ्यास करता येतो, वाचता येते, इतरांना समजून सांगता येते अशा कोर्सची मागणी वाढेल. असे निवडक कोर्स करून ही गरज भागविणे शक्य होईल. त्यामुळे मुलांनी डेटा सॅव्ही, टेक इनवल्ड फूड सायंटिस्ट बनायला हवे. ज्यात ‘फार्म टू फोर्क’ असे पुढे जाता येईल. ते केल्यास जगात ‘फूड डिप्लोमसी’ करण्याचे भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.

(लेखक हे चितळे बंधू उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय भागीदार आणि उद्योजक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com