- डॉ. मंजू हुंडेकर, संचालक - डेव्हलपमेंट सेल, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था
विविध पद्धतीचे कपडे परिधान करणं म्हणजे ‘फॅशन’ करणं असा ढोबळ समज अनेकांचा असतो. त्या पलीकडे ‘फॅशन’ या क्षेत्राकडे पाहिलं जात नाही. मात्र, फॅशनचा नवीन प्रवाह आणताना कल्पकतेपासून पर्यावरणापर्यंत अनेक घटकांचा अभ्यास करावा लागतो. आरामदायी, पर्यावरणपूरक आणि मन प्रसन्न करणारी नाविन्यता जपणं हे ‘फॅशन’ क्षेत्रातील तज्ज्ञांसमोरचं आव्हान असतं. या घटकांचं संतुलन न बिघडता नवनिर्मिती होणं अपेक्षित आहे.