esakal | इंटिग्रेटेड बी.टेक आश्वासक करिअर पर्याय
sakal

बोलून बातमी शोधा

इंटिग्रेटेड बी.टेक आश्वासक करिअर पर्याय

इंटिग्रेटेड बी.टेक आश्वासक करिअर पर्याय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : तुम्ही व्यावसायिक शिक्षणाचा विचार करत असल्यास आणि तेही अभियांत्रिकीमध्ये, तर सहा वर्षाचा इंटिग्रेटेड बी.टेक हा अभ्यासक्रम एक आश्वासक आणि नाविन्यपूर्ण करिअर पर्याय उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसारख्या पारंपरिक शाखांमध्ये उपलब्ध आहे.

या शैक्षणिक वर्षापासून कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स), मेकॅनिकल इंजिनिअरिंग (रोबोटिक्स आणि ऑटोमेशन), इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंग) यासारख्या उदयोन्मुख विषयांमध्ये इंटिग्रेटेड बी.टेक अभ्यासक्रम प्रस्तावित आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

हेही वाचा: नागरिकांच्या 'आरटीओ'तील खेपा वाचणार!

बारावीनंतरचे विद्यार्थी थेट द्वितीय वर्षासाठी अर्ज करू शकतात. हा अभ्यासक्रम दोन भागात विभागलेला आहे. विद्यार्थी पदविका अभियांत्रिकीचा पहिला तीन वर्षांचा प्रोग्रॅम पूर्ण करतो. त्यानंतर तीन वर्षे तो पदवी अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण करतो. यात १२५ क्रेडिट्स असलेला पदविका भाग सर्व नियामक संस्थांच्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करून काळजीपूर्वक तयार केला आहे. उदाहरणार्थ सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी बांधकामाची गुणवत्ता तपासू शकतात आणि स्वतंत्रपणे साइट हाताळू शकतात. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात नेटवर्किंग, वेब डेव्हलपमेंट, तसेच मल्टीमीडिया अनिमेशन, असे अभ्यासक्रम आहेत. पदविका या पहिल्या टप्प्यात सहा महिन्यांची इंटर्नशिप आहे. पदवी अभ्यासक्रमामध्येही इंटर्नशिपसह वैकल्पिक कोर्सेस, ओपन कोर्सेस यावर भर दिला आहे.

प्लेसमेंटमध्ये बी.टेक असणाऱ्यांना नोकरीच्या सर्वाधिक संधी आहेत. या अभ्यासक्रमाच्या आधारे विद्यार्थी आयटी, ऊर्जा, दूरसंचार, ऑटोमोबाईल, उत्पादक, पॅकेजिंग, टायर उत्पादन, ऑनलाइन शिक्षण उत्पादने, रिअल इस्टेट, डिझाइन, उत्पादन, विक्री आणि विपणन, सेवा, ऑटोमेशन, संशोधन आणि विकास, गुणवत्ता नियंत्रण अशा वेगवेगळ्या विभागात काम करू शकतात, असे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेचे सहायक प्राध्यापक प्रा. मंगेश महाजन, पुणे यांनी सांगितले.

हेही वाचा: नागरिकांच्या 'आरटीओ'तील खेपा वाचणार!

loading image